Share

eknath khadse : शिंदे – फडणवीस सरकारचा राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंना दणका! वाचा नेमकं काय घडलं?

eknath khadse

eknath khadse : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर येतं आहे. अलीकडे जळगावमधून एक प्रकरण उघडकीस आलं आहे. जळगाव जिल्हा दूध संघात गैरव्यवहार झाल्याच समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा खडसे चर्चेत आले आहेत.

जळगाव जिल्हा दूध संघात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. याप्ररकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्याच पोलीस दुर्लक्ष करत होते. त्यामुळे खडसेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात अधिकाऱ्यांच्या पातळीवर काही दूध पदार्थांची मोठी चोरी झाल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. यामुळे आता हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. अशातच शिंदे सरकारने एकनाथ खडसे यांना जबर धक्का दिला आहे.

खडसे यांनी गुरुवारी दूध संघातील चोरी प्रकरणात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सायंकाळपासून पोलीस स्टेशन आवारात आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सुरू असतानाच शिंदे सरकारने शुक्रवारी पहाटे ३ वाजता खडसेंना जबर धक्का दिला आहे.

मिळालेल्या महितीनुसार, शिंदे सरकारने खडसे यांना देण्यात आलेली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास काढून घेतली. तर दुसरीकडे याचाच धागा पकडत एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

‘राज्य शासनाविरोधात आंदोलन केल्यामुळेच ही सुरक्षा काढण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. यामुळे आता प्रकरणाला वेगळेच वळण लागलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयावर अद्याप एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now