Share

‘मंदिरात गेले प्रसाद संपला आणि बाहेर आल्यानंतर चप्पल चोरीला गेली अशी अवस्था एकनाथ खडसेंची”

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आमदारांनी बंड केलं, आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता सत्तेत येणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते तसेच नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे मंदिराच्या बाहेर गेले अन् चप्पलच चोरीला गेली अशी झाली आहे, असे महाजन यांनी म्हटलं आहे.

म्हणाले, खरंतर खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली. ते महाविकास आघाडीचा भाग झाले. पण खडसे महाविकास आघाडीत आले आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली.

त्यामुळे खडसेंना आता आमदारकीवरच समाधान मानावे लागेल. पंगत बसली आणि बुंदी संपली. सोशल मीडियावर ऐकलं त्याहीपेक्षा मी असा ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली, अशी अवस्था खडसेंची झाली आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, गिरीश महाजन विरोधी पक्षांवर टीका करताना म्हणाले होते, मी मुंबईतच होतो, गुवाहाटीला वगैरे गेलो नाही. आता आमचं सरकार सत्तेत आलंय. अडीच वर्षात कुठलाही विकास या महाविकास आघाडी सरकारकडून झाला नाही. याउलट भ्रष्टाचार वाढला.

तसेच म्हणाले, महाविकास आघाडीने राज्याला दहा वर्षे मागे नेलं. आता राज्याच्या विकासाला गती द्यायची गरज आहे. अडीच वर्षात विजेचा एकही प्रश्न या सरकारने मांडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असे महाजन यांनी म्हटलं होतं.

राजकारण

Join WhatsApp

Join Now