Share

आता एकनाथ खडसेंनीही बोलून दाखवली नाराजी, म्हणाले, उद्धव ठाकरे सरकार असताना मला..

eknath khadse
माजी मंत्री एकनाथ खडसे हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या व्यक्तव्याने चर्चेत असतात. खडसे हे नेहमीच त्यांच्या आक्रमकपणा, स्पष्टपणा या गुणांमुळे चर्चेत असतात. राज्यात राजकारणात सध्या अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे अख्ख ठाकरे सरकार कोसळलं.

आता विरोधकांच्या गोटात बैठकांच सत्र सुरू आहे. विरोधक जोमाने कामाला लागले आहेत. अशातच एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘सरकार असताना अनेकदा भेट, मात्र न्याय नाही,’ अशी नाराजी खडसे यांनी व्यक्त केली आहे.

वाचा नेमकं खडसे यांनी काय म्हंटलं आहे?

आज जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. विशेष बाब म्हणजे, या बैठकीला  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या बैठकीत मनोगत व्यक्त करताना खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खडसे यांच्या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या बद्दल नाराजी व्यक्त करताना खडसे यांनी म्हंटलं आहे की, ‘राज्यात ठाकरे सरकार असताना मला न्याय मिळाला नाही. हाच जयंतरावांचाही अनुभव असल्याच एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. सध्या खडसे यांच्या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की, ठाकरे सरकार सत्तेत असताना जयंतरावांचाही हाच अनुभव आहे, माझाही अनुभव हाच आहे, शरद पवार साहेब, अजितदादा, जयंतराव, मी मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतरही अनेक वेळा… पुढचं नाही सांगत.. कधी कधी सगळ्या फाईल त्यांच्याकडे गेल्यानंतरही त्यांनी… मी टीका करत नाही.’

दरम्यान, ‘मात्र हे साधारण चालतं, सरकार कोणाचंही असलं, तरी समाधान होतं असं नाही, माझ्या नेत्याने सरकारमध्ये असताना माझं काम केलं पाहिजे अशी प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते, असं खडसे म्हणाले. यावर अद्याप उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या

१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येई
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now