Share

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना ‘दे धक्का’; ‘ते’ १० कोटी महागात पडणार

eknath khadse

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीमधील नेत्यांना अनेक धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते जोमाने कामाला लागले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 

शिंदे सरकारने खडसे यांना धक्का दिला आहे. जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करता व शासनाची मान्यता न घेता, ९ कोटी ९७ लाख रुपयांच्या निधीचा अतिरीक्त खर्च केला, असा ठपका राज्य शासनाकडून ठेवण्यात आला आहे.

यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या अडचणींमद्धे वाढ होणार असल्याच बोललं जातं आहे. याचे कारण असे की, याप्रकरणी आता संचालक मंडळाने त्याचा अहवाल 15 दिवसात पाठवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना शासनाचे उपसचिव नि.भा. मराठे यांनी सहकारी संस्था दुग्ध विभागाच्या सहनिबंधकांना दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या या आदेशामुळे विद्यमान संचालक मंडळासह चेअरमन मंदा खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. याचबरोबर मंदा खडसे यांच्यासह आमदार एकनाथ खडसे यांनादेखील जबर धक्का बसला आहे. गेल्याच महिन्यात दुध संघातील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ बसविण्यात आले होते. 

वाचा नेमकं प्रकरण काय?
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार येताच दुध संघातील संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर नागराज पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने व गिरीश महाजन यांच्या मागणीनुसार शासनाने दुध संघातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. 

यानंतर चौकशी समितीने प्राथमिक चौकशी केली. या चौकशीनंतर, दुध संघात मुख्य दुग्धशाळा व दुग्धजन्य उप पदार्थ प्लॅन्टचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणात अनियमितता होवून निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला. सुमारे ३ कोटी ९९ लाख, असा एकूण ९ कोटी ९७ लाखांचा अतिरिक्त खर्च शासनाची परवानगी न घेताच करण्यात आला असल्याचे दिसून आले. 

महत्त्वाच्या बातम्या
नग्न अवस्थेत तरुण घरात घुसला अन् थेट महिलेशेजारी जाऊन झोपला, महिलेला अचानक जाग आली तेव्हा..
तृप्ती देसाईंना एकनाथ शिंदेंचा निर्णय अमान्य; म्हणाल्या, गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याऐवजी…
Dolo: कोरोनात डाॅक्टर का देत होते डोलो-६५० घेण्याचा सल्ला? १००० कोटींचा घोटाळा आला समोर
Eknath Shinde : गोट्या खेळणाऱ्या मुलांनाही सरकारी नोकरीत आरक्षण? सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now