ekanath khadase on ravi rana and bachchu kadu case | एकनाथ शिंदे यांनी बडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते.त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आणि अपक्षाचे १० आमदार सरकारमधून बाहेर पडले होते. जेव्हापासून त्यांनी बंडखोरी केली आहे. तेव्हापासून त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप विरोक्षी पक्षातील नेते करताना दिसून येत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. खोके देण्याचा आणि घेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदे यांच्याच हातून केलाय असं दिसत आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
राज्यात सध्या रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी असे म्हटले होते की, बच्चू कडू यांनी बंडखोरीसाठी पैसे घेतले होते. तर बच्चू कडूंनी यावर उत्तर देत म्हणाले की, रवी राणा यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करुन दाखवावे.
आता रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात एकनाथ खडसे यांनी उडी मारली आहे. ते म्हणाले की, बच्चू कडू यांनी खोके घेतले की रवी राणा यांनी खोके घेतले याचं उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतील. कारण खोके देण्याचा किंवा घेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदे यांच्या हातानेच केलाय असं दिसत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच या सर्व गोष्टींमधील सत्य एकनाथ शिंदे. बच्चू कडू आणि रवी राणा यांनाच माहिती असेल. मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळेही अनेकजण नाराज आहे, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे हे सध्या मेळघाट दौऱ्यावर आहे. तिथे असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, रवी राणा यांनी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पैसे घेतले की नाही स्पष्ट करावे. तसेच रवी राणा यांनी १ तारखेपर्यंत माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे.
महत्वाच्या बातम्या-
Virendra Sehwag : बाप बाप असतो! सेहवागशी पंगा घेत होता पाकिस्तानी चाहता, वीरुने सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद
keral : बहीणीच्या लग्नाला बापाने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी बारावीतील मुलगी विकतेय शेंगदाने
Saamana : भाजप आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार? सामनातून केलेल्या ‘या’ आवाहनानंतर चर्चांना उधान






