एजाज खानने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला दिला धोखा? सर्वांसमोर तिची माफी मागत म्हणाला.

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपले स्थान निर्माण केले. मात्र याच्या व्यतिरिक्त हे कलाकार आपल्या रिलेशनशिपमुळे ही चर्चेत येतात. असेच कलाकार सध्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहे. खुद्द अभिनेत्याने याबद्दलचा एक खुलासा केला आहे. ही कलाकार जोडी म्हणजे टीव्हीची लोकप्रिय ‘नागिन’ या मालिकेतील अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि ‘बिग बॉस १४’ चा स्पर्धक एजाज खान.

ही लोकप्रिय जोडी टेलिव्हिजन शो ‘काव्यांजली’ चे हिट ऑन-स्क्रीन जोडी होती. या मालिकेपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. कॅनेडियन गायिका नताली डी लुसिओची एजाजशी जवळीकता वाढली. यामुळेच अनिता आणि एजाजमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

तसेच एजाज खानने एका चॅट शो दरम्यान हे देखील कबूल केले होते की, त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची फसवणूक केली होती. परंतु त्याने तिचे नाव उघडपणे सांगितले नाही. पण लोक अनेक प्रकारचे अंदाज लावले. आता एजाज खानने अशा बातम्यांवर मौन तोडले आहे. तसेच या सर्व गोष्टींचा खुलासा देखील केला आहे.

एजाज खानने काही दिवसांपूर्वीच या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘त्याने एक्स गर्लफ्रेंडची फसवणूक केली होती. ती मुलगी मनोरंजन क्षेत्रातील नव्हती.’ तो पुढे म्हणाला की, ‘त्याने ‘बिग बॉस १४’ च्या घरातही याबद्दल सांगितले होते. तसेच आपली चूक मान्य ही केली होती आणि सांगितले की त्याला या गोष्टीची पर्वा नाही.’

तसेच एजाजने सांगितले की, “मी अशा प्रकारचा माणूस नाही जो दुसऱ्याचे नाव घेईल. मी सार्वजनिक मंचावर होतो, मी माझी चूक मान्य केली. मी कोणाचेही नाव घेतले नाही आणि तुम्ही जी नावे घेत आहात ते सर्व चुकीचे आहे. मला ते माझ्यासाठी खूप अपमानास्पद वाटते, कारण मला कोणाचा आधार नाही बनायचं. पोर्टल जे नाव घेत आहे ते चुकीचे आहे.”

एजाज पुढे म्हणाले की, “मला याचा खेद वाटत नाही, कारण मी आता खूप पुढे गेलो आहे आणि त्या व्यक्तीची माफी मागितली आहे. त्या व्यक्तीने मला माफ देखील केले आहे. मी ही एक माणूस आहे. ​फक्त माणसानकडूनच चुका होतात. पण जेव्हा असे लेख येतात तेव्हा मन खचून जाते. मी या सर्व गोष्टींमुळे थकलो आहे.”

 

महत्वाच्या बातम्या
अभिनेत्री रविना टंडनवर कोसळला दुखा:चा डोंगर; झाले जवळच्या व्यक्तीचे निधन…
कोण आहे गोवा जो एकेकाळी रस्त्यावर हिंडायचा पण आता रतन टाटांच्या प्रत्येक मिटींगला हजर असतो
सॅलरी अकाऊंटचे हे फायदे वाचाल तर थक्क व्हाल, आजच खोला स्वत:चे सॅलरी अकाऊंट
दोन हिरो असणारे हे चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, वाचा संपुर्ण यादी