शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून अटक करण्यात आली आहे. एचडीआयएल घोटाळ्या प्रकरणी ही अटक झाली आहे. 1 हजार 34 कोटींचा पत्राचाळ जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
या प्रकरणात अनेकांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यामुळे ईडीने त्यांना अटक केली आहे. गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ही अटक करण्यात आली आहे.
प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. प्रवीण राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एचडीआयएल मधील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. कारण 2010 मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याच्या नोंदी होत्या. एकूण 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांना याबाबतचे पुरावे सापडले होते. या प्रकरणात ईडीने अनेक लोकांची चौकशी केली होती. त्यामुळे राजकारण तापलं होतं.
प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळाशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबासोबत देखील त्यांचे संबंध आहेत. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे 90 कोटी रुपये हडपले असल्याचे आरोप ईडीने त्यांच्यावर केला आहे.
प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होते. या व्यवहारमुळेच प्रवीण राऊतांचे एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.