गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. केंद्रातील सरकार पदाचा दुरुपयोग करून त्रास देत असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे.
त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातील संघर्ष अधिक वाढल्याचे दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून एक खळबळजनक वृत्त समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या एका आमदाराची मुलासह ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती हाती येत आहे.
या चौकशीमुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. माढाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाली असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.
यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे. शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयात ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती हाती आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे साखर कारखान्याचे हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात जात असल्याची माहिती समोर आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यापासून बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची तीन वेळा चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्यानेच राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात ईडीकडे दिली तक्रार होती. शेतकऱ्यांचा घामाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार, वेळ प्रसंगी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात याविरोधात आवाज उठवणार असं माढ्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
KGF: कोलार गोल्ड फिल्डचा इतिहास वाचाल तर अवाक व्हाल, १२१ वर्षात मिळाले होते ९०० टन सोने
अप्लवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या बाबाच्या घरावर चालवला बुलडोझर, वकीलांनीही केला हल्ला
आदिपुरूष: प्रभासचा राघव लुक धमाकेदार पद्धतीने होणार रिलीज, सगळ्यात आधी ‘या’ व्यक्तीने बघितला
मुलीच्या मृत्युनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावयाचा आणि नातवांचा हक्क; न्यायालयाचा मोठा निर्णय