(Twitter)औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात सामील झाले होते. तरीही त्यांना मंत्रिपदात संधी मिळाली नाही. मंत्रीपदासाठी वेळेवर अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांची नावे घेण्यात आली. त्यामुळे संजय शिरसाट यांचे नाव मंत्रिपदात घेण्यात आले नाही, अशी चर्चाही झाली होती. शिरसाट नाराज असल्याचेही ऐकण्यात आले होते.
शिरसाट यांनी शुक्रवारी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांना कुटुंबप्रमुख असे संबोधले आहेत. ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषणही त्यांनी जोडलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे, दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच, असे म्हणताना दिसत आहेत.
संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळलेलं नाही. यातून शंका उत्पन्न होते की, संजय शिरसाट यांना मंत्रिपदाचे वचन मिळाले होतं का? आणि ते वचन पूर्ण झालं नाही, म्हणून शिरसाट यांचा हा शिंदे गटाला इशारा तर नाही ना? असा प्रश्न उभा करणारं हे ट्विट होतं. नंतर त्यांनी ट्विट डिलीट सुद्धा केलं आहे.
संजय शिरसाट यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विट ला स्पष्टीकरण देत अजून एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, “मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. काल झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, शिवाय उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत.
उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख होते. आम्ही त्यांना मानही दिला परंतु त्यांनी आमच्या शब्दाचा मान राखला नाही. कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या मताचा आदर केला नाही. त्यांनी आमचं ऐकलं नाही. आताची जी अवस्था आहे ते पाहून आम्हालाही खेद वाटतो, असंही शिरसाट म्हणाले.
आता मोबाईल वापरू नये किंवा बंद ठेवावा
मी उद्धव ठाकरे यांचा कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख करून जे ट्वीट केले दिसत होते. तो मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम होता. जुने मार्च महिन्यात ड्राफ्ट केलेले ट्विट चुकून आता ट्विटरवर दिसू लागले आहे, असे त्यांनी म्हटले. या एका ते
ट्विटमुळे बराच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे आता मोबाईल वापरू नये किंवा बंद ठेवावा असंही वाटत असल्याचे शिरसाट म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराने संजय शिरसाट नाराज आहे. लवकरच शिंदे गटातून बाहेर पडून ठाकरेंकडे परतणार अशा बातम्या येत होत्या. पण तसा कोणताही विचार नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : सच्च्या शिवसैनिकाचा जीव वाचवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आले धावून; केली ‘इतक्या’ लाखांची मदत
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच दिलं इंग्रजीत भाषण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिंदे गटातील ‘या’ बड्या आमदाराने उद्धव ठाकरेंना म्हटले कुटुंबप्रमुख; परत येण्याचे दिले संकेत?
शिंदे गटातील ‘या’ बड्या आमदाराने उद्धव ठाकरेंना म्हटले कुटुंबप्रमुख; परत येण्याचे दिले संकेत?






