Share

dussehra melava : अखेर ठरलं! दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला? पालिकेने एका वाक्यात केला विषय ‘क्लोज’

uddhav thackeray eknath shinde

dussehra melava : यंदाचा दसरा मेळावा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिलाच दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे.

शिवाजी पार्कमधील शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाकडून तयारी सुरू आहे. अशातच मुंबई महानगर पालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. दसरा मेळाव्यासाठी महानगर पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. यामुळे आता दोन्ही गटांकडून काय प्रतिक्रिया येतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई महानगर पालिकेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेने एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आल्याच बोललं जातं आहे.

याबाबत मुंबई महानगर पालिकेने एक पत्रक काढलं आहे. पालिकेने पाठवलेल्या पत्रात म्हंटलं आहे की, ‘पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायावरुन परवानगी नाकारली असल्याचं पालिकेने म्हंटलं आहे. याचबरोबर मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायाचा हवाला या पत्रात देण्यात आला आहे.

वाचा नेमकं पालिकेने का नाकारली परवानगी..?
दोन्ही गटांमध्ये गणपती विसर्जनावेळी राडा झाला,त्यानंतर प्रभादेवीमध्ये राडा झाला होता. यामुळेच मेळव्याला परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे आधीच शिवाजी पार्कवरील मेळाव्याची परवानगी मुंबई महानगर पालिकेने नाकारली आहे.

तसेच आता यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या वतीने किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बीकेसीमध्ये शिंदे गटाला परवानगी मिळाली आहे. पण तरीही शिवाजी पार्कमध्ये घुसून ते परवानगी मागत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा त्यांच्यावर ढकलला जाईल, या दृष्टीने त्यांनी परवानगी नाकारली आहे. आता न्यायालयाचा जो निर्णय येईल, तो आम्ही स्वीकारू”, असं पेडणेकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी 
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now