स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘किसान भागीदारी, प्राथमिक हमारी’ या मोहिमेचा शुभारंभ नुकताच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी बोलताना त्यांनी एक अजबच दावा केला आहे. त्यांनी, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर १० पटीने वाढले असल्याचे म्हणले आहे.
देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना, “तुमच्या मार्गदर्शन आणि प्रयोगाने गावातील सर्वसामान्य शेतकरी जोडला जाईल. त्यामुळे छोटा शेतकरी देखील समृद्ध होऊन देशाच्या जीडीपीमध्येही शेतीचे योगदान वाढेल. तसेच अर्थकारण मजबूत होण्यास मदत होईल” असे नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हणले आहे.
त्याचबरोबर, जे शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, योजनांचा लाभ घेत आहेत त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. तसेच त्या शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर १० पटीने वाढले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
पुढे बोलताना, “उत्तन्न वाढलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना जागरुक केले पाहिजे जेणेकरुन तेही समृद्ध होतील. सरकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी संबंधित योजनांशी संबंधित शेतकरी समृद्ध झाले आहेत. त्यांच्या कुटुंबाची प्रगती झाली आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांत अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन ते दहा पटीने वाढले आहे. हे शेतकरी कृषी दूत म्हणून गावोगावी गेले तर शेतीची अर्थव्यवस्था मजबूत होईल. नैसर्गिक शेतीमुळे शेतीवरील खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळेल” असा विश्वास तोमर यांनी व्यक्त केला आहे.
यानंतर “आज शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारात किमान आधारभूत किंमतीपेक्षा चांगला भाव मिळत आहे. गहू व मोहरीला चांगला भाव मिळत असून, मोहरीच्या तेलातील भेसळ बंद झाल्याने शेतकरी सुखावला आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या हिताची इतर पावलेही सरकार उचलणार आहे” अशी माहिती नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्वच मनसेचा वापर करत आहे”
…तर भारतात श्रीलंकेसारखी परिस्थीती ओढवेल, याचं भानं केंद्राने ठेवावं; रोहीत पवारांचा घणाघात
‘महाराजांच्या सिनेमांना प्राईम शो मिळवण्यासाठी झगडावं लागतं’; चिन्मय मांडलेकरांनी व्यक्त केली खंत