पाकिस्तानमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य आता संपले आहे. इम्रान खान सत्तेतून बाहेर पडले असून त्यांच्या जागी शाहबाज शरीफ यांना नवे पंतप्रधान बनवण्यात आले आहे. मात्र, हे सत्तांतर होत असताना एक अजब घटना घडली असल्याचे बोलले जात आहे, ज्यामध्ये एका लष्करप्रमुखाने चक्क इम्रान खान यांच्या कानशिलात लगावली.
इम्रान खान यांच्या सरकारविरोधात नॅशनल असेंब्लीत नुकताच अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला, आणि इम्रान खान यांचं सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षाने बहुमताचा दावा केला आणि मुस्लीम लीग या पक्षाचे नेते शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदी विराजमान झाले.
मात्र, या दरम्यान एक इम्रान खान यांच्यासोबत एक घटना घडली असल्याचं बोलले जात आहे. माहितीनुसार, अविश्वास प्रस्तावावर मतदान होत असताना इम्रान खान यांनी त्यांच्या निवासस्थानी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यात इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता.
या मुद्द्यावरून इम्रान खान यांचा बैठकीत उपस्थित पाकच्या लष्कराशी संघर्ष झाला. इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना बरखास्त केलं. त्यावेळी बाजवा यांनी इम्रान खान यांच्या कानशिलात लगावली अशी चर्चा सध्या होत आहे. या घटनेवर सध्या अनेक वृत्तसंस्था वेगवेगळी माहिती देत आहेत.
झालेली घटना खरी आहे का याचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, इम्रान खान यांच्या निवासस्थानी झालेल्या त्या बैठकीवेळी दोन लोक हेलिकॉप्टरमधून पोहोचले होते. या लोकांशी खान यांची 45 मिनिटे चर्चाही झाली होती. मात्र हे लोक नेमके कोण होते, हे अद्याप समोर आलेले नाही. घटनेबद्दल ठोस माहिती समोर आली नाही.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक ए. के. सिवाच यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, लष्करप्रमुख बाजवा यांनी इम्रान खान यांना कानशिलात लगावली असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य असण्याची शक्यता कमी असून या अफवा असाव्यात.
मात्र, त्यानी हेही सांगितले की, डीजी आयएसआयच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये संघर्ष सुरू होता आणि बाजवा यांची उचलबांगडी व्हावी, अशी इम्रान खान यांची इच्छा होती. परंतु, इम्रान खान यांच्या कानशिलात मारली याबद्दल त्यांना माहिती नाही. त्यामुळे इम्रान खान यांच्या कानशिलात लगावली ही घटना खरी आहे की अफवा याबद्दल अद्याप काही ठोस पुरावे मिळाले नाहीत.