पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षाचा मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गु ११ जानेवारीला बालेवाडी परिसरातून बेपत्ता झाला होता. पण बुधवारी डुग्गु वाकड जवळीच्या पुनावळे येथील एका इमारतीत सापडला. डुग्गु सापडल्यामुळे त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. पण डुग्गूच्या कुटूंबियांच्या या आनंदावर विरजण आले आहे.
स्वर्णव उर्फ डुग्गु सुखरूप घरी पोहचला, ही आनंदाची बातमी मिळाल्यानंतर डुग्गूची आत्या त्याला भेटण्यासाठी रात्री नांदेडहून निघाली होती. पण अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सुनीता संतोष राठोड ( वय ३६ ) यांचा नगर महामार्गावर कारच्या अपघातात मृत्यू झाला असून त्यांची दोन मुले समर राठोड ( वय १४ ) व अमन राठोड ( वय ६ ) गंभीर जखमी झाली आहेत.
त्याचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या दोन्ही मुलांना उपचारासाठी पुण्यातील बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पुण्याजवळ नगर महामार्गावर हा अपघात झाला असून त्यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरील इंदू पार्क सोसायटीजवळील उद्यानाजवळून स्वर्णव ऊर्फ डुग्गु सतीश चव्हाण (वय ४ वर्षे ) यास एक मुलगा “डे केअर’ला सोडविण्यासाठी पायी घेऊन जात होता. त्यावेळी आलेल्या एका व्यक्तीने मोठ्या मुलाच्या हाताला झटका देऊन स्वर्णवला गाडीवरुन उचलून नेत त्याचे अपहरण केले होते.
याप्रकरणी मुलाच्या आई-वडीलांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. डुग्गुला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची एक मोठी फौज तैनात करण्यात आली होती. त्याच्या शोधावेळी अत्यंत गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. अखेर काल वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले होते.
डुग्गूच्या आई वडिलांनी या प्रकरणी पुणे पोलिसांचे आभार मानले होते. डुग्गुला पाहताच त्याच्या आईला खूप आनंद झाला होता. डुग्गु सापडल्याचा आनंद सर्वत्र साजरा केला जात होता. स्वर्णवला भेटायला येणाऱ्या आत्याचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे डुग्गूच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. बाणेर परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
डुग्गु सापडल्याच्या आनंदावर विरजण! डुग्गूला भेटायला येणाऱ्या आत्याचा अपघातात मृत्यू‘
‘हा’ स्टॉक नाही कुबेराचा खजाना आहे, १ वर्षात दिलाय २००० टक्के छप्परफाड रिटर्न
“शरद पवार पावसात भिजल्याने लोकांची मने विरघळली, मात्र आता त्यांनी दिलेली आश्वासनेही विरघळली”






