भारत – दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी २० सामन्यात काल सुर्यकुमार यादव सोबत अशी घटना घडली ज्यामुळे विराट कोहलीला त्यासाठी जबाबदार धरलं जात आहे. नेटिझन्स सोशल मीडियावर विराटप्रति राग व्यक्त करत आहेत. आता विराटने नेमकी काय चूक केली? जाणून घेऊयात.
कालच्या सामन्यात सूर्यकुमार यादव भन्नाट फटकेबाजी करत होता. तो सामन्यात शतक झळकावेल असे वाटत होते. पण यावेळी विराट कोहलीकडून एक चूक घडली आणि त्यामुळे सूर्यकुमार यादवची विकेट पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नेटिझन्सनी विराटवर राग काढला.
सुर्यकुमार यादव सोबत ही घटना १९ व्या षटकात घडली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्किया गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्यात चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. या पहिल्याच चेंडूचा सामना विराट कोहली करत होता.
विराटने हा चेंडू ऑफ साईडला मारला. सूर्या त्यावेळी भन्नाट फॉर्मात होता. त्यामुळे त्याला यावेळी स्ट्राइक हवी होती. त्यामुळे कोहलीने चेंडू मारल्यावर एक धाव घ्यायची, असे सूर्याच्या मनात होते. ही धाव होऊ शकली असती. पण त्यावेळी कोहली हा चेंडूकडे बघत राहीला आणि त्याने सूर्याकडे पाहिले नाही.
पण सूर्या ही धाव घेण्यासाठी पुढे सरसावला होता. कारण या चेंडूवर धाव घेत आपली फटकेबाजी कायम ठेवायची, हे त्याच्या मनात होते. सूर्या यावेळी धावत गेला, पण कोहलीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सूर्या यावेळी बाद झाला.
सूर्या हा त्यावेळी भन्नाट फॉर्मात होता. त्याचे शतकही होऊ शकले असते आणि भारताच्या अजून धावा झाल्या असत्या. पण त्यासाठी कोहलीने सूर्याची विकेट वाचवणं हे सर्वात महत्वाचं होतं. पण कोहलीने यावेळी आपली विकेट वाचवली आणि त्यामुळे सूर्या आऊट झाला.
सूर्या दादा at his best! 🫶🔥#OneFamily #INDvSApic.twitter.com/sRNb5tguKP
— Mumbai Indians (@mipaltan) October 2, 2022
त्यामुळे सूर्यकुमारचे शतक झळकावण्याचे स्वप्न यावेळी हुकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नेटिझन्सनी विराटवर राग व्यक्त केला. विराटला जबाबदार धरले. विराटने स्वतः च्या विकेटचा त्याग करायला हवा होता, असा सूर आता सोशल मीडियावर सुरू आहे.