Share

आलियाच्या ‘गंगुबाई काठियावाडी’च्या व्हाईट साडी लूकमागे आहे ‘हे’ कारण, जाणून आश्चर्य वाटेल

gangubai kathiawadi

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (gangubai kathiawadi) या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. शुक्रवारी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली कमाई करत धमाकेदार सुरुवात केली आहे. यादरम्यान आलियासंबंधित एक गोष्ट माध्यमात चर्चेत आहे. ती म्हणजे आलिया ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेहमी व्हाईट साडी लूक करत आहे. तर आलिया व्हाईट साडी लूक करण्यामागचे नेमके कारण काय? ते जाणून घेऊया.

प्रसिद्ध स्टायलिश अमी पटेल यांनी आलिया गंगूबाईच्या प्रमोशनदरम्यान व्हाईट साडी लूक करण्यामागील कारण सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर आलियाचा व्हाईट साडी लूकमधील फोटो शेअर करत लिहिले की, ‘पांढरा रंग हा खास असतो कारण त्यात इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतात. मी पाहिले की, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात सर्व भावनांचे रंग दाखवण्यात आले आहेत. तुझ्या या दमदार कामगिरीसाठी मी तुझे कौतुक करते आलिया’.

अमी यांनी पुढे ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे कौतुक करताना लिहिले की, चित्रपटात गंगाचा गंगूबाई होण्यापर्यंतचा प्रवास पाहून मी अक्षरशः रडले. तसेच शेवटपर्यंत मी माझ्या भावना व्यक्त करत राहिले. तुमचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. संजय लीला भन्साळी तुम्ही खरंच एक जादूगार आहात’.

दरम्यान, आलियाच्या इन्स्टाग्राम हँडलवर पाहिल्यास तिने व्हाईट साडी लूकमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. या सर्व फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. आलियाच्या या फोटोंवर चाहते लाईकचा वर्षाव करत त्यावर भरभरून कमेंटही करत आहेत.

दरम्यान, ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात गंगूबाई यांचा संघर्षमय जीवन दाखवण्यात आला आहे. आलियासोबत या चित्रपटात अजय देवगन आणि विजय राज मुख्य भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले
महेश भट्ट सर्वांसमोर मला मुलगी म्हणून बोलावयाचे, पण रात्री मात्र हाॅटेलमध्ये…
फक्त जॅकलीनलाच नाही तर ठग सुकेशनने या अभिनेत्रींनाही दिले आहेत महागडे गिफ्ट्स, नावं वाचून अवाक व्हाल

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now