Share

सोसायटीतील पराभव लागला जिव्हारी! काॅंग्रेस कार्यकर्त्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा ढाबाच पेटवला

अनेकवेळा गाव पातळीवर झालेला पराभव, नाचकी, अपमान लोकांना खपत नाही. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकता. आता देखील अशीच एक घटना जत तालुक्यातील एका गावात घडली आहे. या गावात निवडणूकीत पराभव झाल्यामुळे चक्क विरोधक उमेदवाराने थेट ढाब्यालाच आग लावली आहे.

या आगीत तब्बल 11 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुचंडी सोसायटीची शनिवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस गटाच्या विरोधात उभे राहिलेल्या राष्ट्रवादीच्या पुरस्कृत पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. यात काँग्रेस गटाची हार झाल्यामुळे गटातील एकाने मनात राग धरुन विरोधी गटातील व्यक्तीच्या ढाब्यालाच आग लावली.

सोमवारी 7 मार्च रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मुचंडी येथील श्रीधर कोळी यांच्या ढाब्याला ही आग लावण्यात आली आहे. मध्यरात्री सर्व गाव झोपेत असतानाच या आगीचा सुगावा गावकऱ्यांना लागला. यानंतर घटनास्थळी सर्वजण दाखल झाले. आपल्या नविन ढाब्याला आग लागलेली पाहून श्रीधर कोळी यांच्या पायाखालील जमिनच सरकली.

या घडलेल्या घटनेनंतर श्रीधर कोळी यांनी जत पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. कोळी यांनी दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी महांतेश नारायण मलमे, नारायण मलमे, दर्याप्पा मलमे, प्रकाश मलमे, प्रविणकुमार मलगोंडा पाटील, श्रीनिवास मलगोंडा पाटील, अशा सहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा विजय झाल्यामुळे गावात जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते. यानंतर सर्वकाही अटपून कोळी आपल्या घरी निघाले होते. त्यावेळीच संशयित आरोपींनी कोळींना शिवीगाळ करत मारहाण केली.

यावर न थांबता आरोपी रात्री 8 वाजता कोळींच्या घरी आले. इथेही त्यांनी कोळींना जीवे मारण्याची थमकी दिली. याला थोडा वेळ उलटून जाताच ढाब्याला आग लागल्याची बातमी गावात पसरली. या घडलेल्या प्रकारामुळे गावात शांतता पसरली आहे. सध्या या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या
महिंद्राच्या ‘या’ कारची किंमत फक्त १२,४२१ रुपये; स्वत: आनंद महिंद्रांनीच ट्विट करत जाहीर केली किंमत
आता महाविकास आघाडीही झाली आक्रमक; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांना पोलीसांनी केली अटक
राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला; आघाडी विरोधात कोर्टात जाणाऱ्या भाजपलाच कोर्टाने झापले
माझ्यासोबत चुकीचं वागणाऱ्यांना मी सोडणार नाही; तेजश्री प्रधानची जाहीर धमकी कुणाला?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now