मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा झाली. सभेत त्यांनी औरंगाबादमध्ये येऊन ओवैसीने औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले यावरून विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे. ‘आम्ही लोण्याचे थंड गोळे आहोत’ असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या जाहीर सभेत अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसीवर फटकेबाजी केली आहे. हे सगळं घडत असताना आपण थंड लोण्याच्या गोळ्यासारखं बसलो आहोत असाही टोला विरोधकांना लगावला आहे.
राज ठाकरे म्हणाले, मला वाटलं ओवैसीने ज्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवलं तेव्हा महाराष्ट्र पेटून उठेल पण तसं काही झालं नाही. महाराजांना मारण्यासाठी विजापूरहून आलेल्या अफजलखानाची कबर पहिल्यांदा चार पाच फुटातच होती ती आता पंधरा ते वीस हजार फूटात झाली आहे.
अफजलखानाची मशिद तिथे उभी राहिली आहे. त्यासाठी देणग्या येत आहेत. ह्या देणग्या देणाऱ्या अवलादी कोण आहेत? असा सवाल राज यांनी केला. तसेच म्हणाले, या घटना घडत असताना आपण थंड पडलो आहोत, आम्ही थंड लोण्याचे गोळे आहोत, असं ते म्हणाले.
त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. म्हणाले, शरद पवार म्हणतात की, अफजलखान हा शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता, तो आपला धर्म वाढवण्यासाठी आला होता, आता यावर काय बोलावं? यांच्या अशा राजकारणामुळे निजामांच्या अवलादी महाराष्ट्रात वळवळ करू लागल्यात.
तसेच त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात ज्या चर्चा सुरू आहेत, यावर देखील त्यांनी आपले मत व्यक्त केले. म्हणाले, आपल्या पायाच्या दुखण्याच्या कारणामुळे आयोध्या दौरा स्थगित करत आहोत. आता सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली , त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कोणते प्रतिउत्तर देईल पाहावं लागेल.