चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्रींवर दबाव असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. याशिवाय असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना अनेकदा त्यांच्या वजनामुळे ट्रोल व्हावे लागते.(due-to-increasing-weight-ya-actress-was-shown-the-way-out-now-she)
जर एखादी मुलगी गोरी किंवा सडपातळ असेल तर ती बहुतेक लोकांच्या नजरेत सुंदर असते. आता काळ खूप बदलला असला तरी अजूनही अनेक अभिनेत्रींना (Actress)त्यांच्या वजनामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. अशाच एका टीव्ही अभिनेत्रीने तिचा वाईट अनुभव लोकांसोबत शेअर केला आहे.
‘गम है किसीके प्यार में'(Gum Hai Kisi ke pyar mein) या टीव्ही सिरीयलमध्ये ‘श्रुती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शफाक नाज(Shafak naaz) हिलाही लठ्ठपणामुळे वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. अभिनेत्रीने सांगितले की इंडस्ट्रीतील अभिनेते त्यांच्या शरीराच्या आकारामुळे आणि सौंदर्यामुळे कसे दबावात येतात.
अभिनेत्रींना नेहमी स्लिम राहा असे सांगितले जाते. याशिवाय शफाकने असेही सांगितले की, वाढलेल्या वजनामुळे तिला नाकारण्यात आले. शफाक म्हणाली, ‘मी ऑडिशन(Audition) द्यायला गेले होते, त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, माझे वजन वाढल्यामुळे ते मला भूमिका देऊ शकत नाही.
काही काळापूर्वी माझी प्रकृती खालावली होती. यामुळे मी वेट गेन केले होते. मला आश्चर्य वाटले की ज्या मुलींचे वजन जास्त आहे ते रोज हे सर्व कसे सहन करतात.
शफाक पुढे म्हणाली- ‘जर कोणी चांगला कलाकार असेल तर तो किती साईजचा आहे याने काही फरक पडत नाही. मी माझ्या स्किंमध्ये खुश आहे, परंतु जेव्हा मी हे सर्व पाहते तेव्हा या गोष्टी माझ्या मनात राहतात. आपल्याला हे फेक ब्युटी स्टँडर्ड(Fake beauty standard) संपवण्याची नितांत गरज आहे.