बॉलिवूडचे कलाकार हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. हे कलाकार त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमी चर्चेत असतात. त्याच्या रिलेशनशिपबद्दलच्या नेहमी चर्चा सुरू असतात. अशीच एक अभिनेत्री आहे जिच्या रिलेशनशिपच्या चर्चेला उधाण आले होते.
या अभिनेत्रीने आपल्या बॉयफ्रेंडकडे अशी काय मागणी केली ज्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडला हॉस्पिटलमध्ये जावं लागला. या घटनेचा अभिनेत्रीने तब्बल १० वर्षांनंतर खुलासा केला आहे. या अभिनेत्रींचे नाव अमृता राव असे आहे. अमृताने आपल्या सौंदर्याने आणि अदाकरीने चाहत्यांना वेड लावले होते. अमृताने मोजक्याच चित्रपटात काम केले आहे. मात्र सध्या ती रुपेरी पडद्यापासून दूर आहे.
अमृताने बॉयफ्रेंड अनमोल सोबत लग्न केले. तो एक आरजे आहे. सध्या अमृता आणि तिच्या बॉयफ्रेंडचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ‘कपल ऑफ थिंग्स’या शोमधील आहे. ज्यामध्ये या घटनेचा खुलासा केला आहे. ‘मिशन रंग बरसे’ च्या सीन्ससाठी या दोघांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती.
याच दरम्यान या दोघांनी काहीतरी पिण्यासाठी घेतले होते. त्याचा एक घोट घेताच अमृताने ते पूर्ण पिण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडला दोन्ही ग्लासमधील पेय पिले. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्यावेळी अमृता आणि अनमोलला मदत करण्यासाठी त्याची बहीण देखील तेथे पोहचली होती. या सर्व प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने साल २००२ मध्ये ‘अब की बरस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. साल २००४ मध्ये ती ‘मैं हू ना’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर साल २००६ मध्ये ‘विवाह ’ या चित्रपटात अमृता दिसून आली. या चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली होती.
तसेच तिने ‘इश्क विश्क’, ‘मस्ती’, ‘वेलकम टू सज्जनपुर’, ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’, ‘राज २’,‘जाने कहां से आइ है’,‘जॉली एलएलबी’,‘सत्याग्रह’ असे अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर अनेक चित्रपट हे सुपरहिट ही झाले आहेत. यातील असे अनेक चित्रपट आहेत जे चाहते आजही आवडीने पाहतात.
महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी ‘या’ व्यक्तीसोबत मिळून माझ्यावर हल्ल्याचा कट रचला, सोमय्यांचा गौप्यस्फोट
जन्मदात्या आईने चिमुकल्याला साडीला बांधून दहाव्या मजल्यावर लटकवले, कारण वाचून चक्रावून जाल
आॅस्ट्रेलियाविरूद्ध मी जिंकवलं पण त्याचं श्रेय मात्र दुसऱ्यांनी घेतलं’; अजिंक्य रहाणे का भडकला?
निर्लज्जपणाचा कळस! लाखाची लाच घेताना पकडली गेली महिला अधिकारी, तरी खिदीखिदी हसत म्हणाली…