छत्तीसगडमधील बिलासपुरमधून एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दारूच्या नशेत जावयाने थेट सासरवाडी गाठली. आणि तिथं जाणून जावयाने महिलेशी लाजिरवाणे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. सध्या या प्रकरणी जावयाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
तर जाणून घेऊ या.. हे नेमकं प्रकरण काय? जावयाने हे पाऊल का उचलले? ही घटना आहे छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) बिलासपुरमधील. दारूच्या नशेत जावई सासरी गेला आणि थेट मेव्हण्याच्या 20 वर्षीय पत्नीच्या खोलीत शिरला. नशेत असलेल्या जावयाने महिलेला जबरदस्ती केली.
घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला. शेजारचे नागरिक जमा होतास जावयाने तिथून पळ काढला. घडलेला संपूर्ण प्रकार महिलेने तिच्या पतीला सांगितला. त्यांतर तात्काळ जाणून त्याने पोलिस ठाण्यात जाणून याबाबत तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी जावयावर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साधारण 7 वाजता ही घडली आहे. रामगोपाल यादव (28) असे जावयाचे नाव असून लिंगियाडीह येथील ते निवासी आहेत. तसेच तो प्राइवेट जॉब करतो. मात्र कुटुंबियांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, त्याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन आहे.
दरम्यान, लगेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती आरोपी रामगोपाल याच्या पत्नीला मिळाली. पतीचं कृत्य ऐकल्यानंतर तिलाही धक्का बसला. मात्र याबाबत पोलिसांना सांगिताना तिने पतीविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. सध्या त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या घटनेबाबत कुटुंबियांकडून सांगितलं जात आहे की, ज्यावेळी आरोपी रामगोपाल आपल्या मेव्हण्याच्या घरी पोहोचला, त्यावेळी मेव्हणा घरी नव्हता. त्याच्या पत्नीला एकटं पाहून तो जबरदस्ती करू लागला. सध्या या प्रकारामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण आहे.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! ‘तुझ्या मुलीला माझ्या स्वाधीन कर नाहीतर…’ तरुणाची प्रेयसीच्या आईला धमकी
डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडाचा गुंता सुटेना, आणखी एका नवीन खुलाश्याने पोलिसही झाले हैराण
व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अमृता फडणवीस यांची खास पोस्ट; म्हणाल्या, “तू माझ्या हृदयात, मनात, श्वासात…”
‘नुकसान झालं तरी चालेल’, म्हणत साध्या देशी सायकलमध्ये पैसै गुंतवण्यास आनंद महिंद्रा तयार