मुंबई क्रुझ शीप ड्रग्ज प्रकरणी एनसीबी कडून किंग खानच्या मुलाला म्हणजे आर्यन खानला क्लिन चीट मिळुन अजून काही दिवस झाले नाही, तोपर्यंतच अजुन एका बॉलीवूड सेलिब्रिटीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला बेंगळुरू पोलिसांनी एका रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतलं आहे. सिद्धांतवर ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. बेंगळुरूमधल्या एका पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी रविवारी रात्री धाड टाकली होती.
यावेळी पोलिसांनी ३५ जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांची वैद्यकीय ड्रग्ज सेवन चाचणी केल्यानंतर त्यापैकी ६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या सहा जणांना अटक करण्यात आली असुन यामध्ये सिद्धांतचाही समावेश आहे. म्हणुन त्याला बंगळुरुच्या उलसुरु पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आहे.
कोण आहे सिद्धांत कपूर?
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता शक्ति कपूरचा मुलगा आशी सिद्धांत कपूरची ओळख आहे. तसेच आपल्या बहिणी व वडिलांप्रमाणे सिद्धांतसुद्धा बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून काम करत आहे. त्याने काही चित्रपट आणि वेब शोमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सिद्धांत हा डीजेसुद्धा आहे.
सिद्धांतचं करिअर
२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भागम भाग’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भौकाल’ या वेब सीरिजमध्ये त्याने भूमिका साकारली होती. ‘भौकाल २’मध्येही तो चिंटूची भूमिका साकारणार आहे. तर अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’मध्येही तो झळकला होता. तसेच ‘चुप चुपके’, ‘भुल भुलैय्या’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.
अभिनेता म्हणून त्याने २०१३ मध्ये ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटातून पदार्पण केलं. याशिवाय त्याने जजबा, पलटन, बोंबारियाँ, यारम, हॅलो चार्ली, भूत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्ली’ या चित्रपटासाठी त्याने अनुराग कश्यपसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. यामध्ये त्याने छोटीशी भूमिकासुद्धा साकारली होती.
महत्वाच्या बातम्या
संतोष जाधवच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या; मुसेवालाच्या खुनाबाबत खळबळजनक माहिती उघड
IPL मिडिया ऑक्शनमध्ये BCCI मालामाल, एका सामन्याची किंमत गेली तब्बल ‘एवढ्या’ कोटींच्या पुढे
मुलाला ड्रग प्रकरणात अटक होताच संतापले शक्ती कपूर; म्हणाले, हे कदापी शक्य नाही, माझा मुलगा…
लोकप्रियतेचा इतिहास रचणाऱ्या बॉर्डर चित्रपटाने घेतला होता ५९ लोकांचा जीव; वाचा नेमकं काय घडलं होतं…