Share

‘या’ गिअरमध्ये गाडी चालवल्यास होणार पाच हजारांचा दंड; मोदी सरकारचा मोठा निर्णय

घाटातून प्रवास करत असताना इंधनाची बचत व्हावी यासाठी वाहनचालक गाडी नेहमी न्यूट्रल गिअरमध्ये चालवतात. मात्र, आता अशा पद्धतीने गाडी चालवली तर तुम्हाला दंड बसणार आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

इंधनाची बचत व्हावी यासाठी घाटात न्यूट्रल गिअरमध्ये गाडी चालवतात. मात्र, आता अशा पद्धतीने कोणी गाडी चालवत असेल तर त्याला पाच हजार रुपयांचा दंड बसणार आहे. उतारावरून मोटार गाडी चालवत असताना सहसा न्यूट्रल गिअरवर चालवली जाते.

मात्र, गाडी जर न्यूट्रल गिअरमध्ये चालवली तर समोरून येणाऱ्या वाहनांसाठी धोका निर्माण होत असतो. परिणामी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे केंद्रीय रस्ते मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता इंधनाची बचत म्हणून न्यूट्रल गिअरमध्ये गाडी चालवणाऱ्यांवर बंधन आलं आहे.

याबाबत केंद्रीय रस्ते मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इंधनाचे भाव वाढल्याने घाटातील बहुतांश वाहन चालक हे गाडी न्यूट्रल गिअरमध्ये किंवा बंद करून वाहन चालवतात. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते.

त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाच्या वतीने दंडात्मक कारवाईची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, घाटातील उतारावर वाहने जर न्यूट्रल गिअरमध्ये किंवा बंद करून चालवली तर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना पहिल्या वेळेस एक हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाऊ शकतो. जर दुसऱ्यांदा हाच गुन्हा केला तर तीन हजार रुपयाची दंडात्मक कार्यवाही केली जाऊ शकते. चारचाकी किंवा त्यापेक्षा अधिक जड अवजड वाहनांनी घाटातून प्रवास करताना हा नियम मोडला तर जास्त दंड आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now