Share

स्वर्थीपणाची हद्द पार, वर्ध्यात अपघातात झाला चालकाचा मृत्यु, लोकांनी पिशव्या भरून पळवली द्राक्ष्य

अपघात झाल्यानंतर अनेक जण मदतीला धावून येत असतात हे खरे आहे. मात्र यात काही लोक असेही असतात ज्यांना कोणाच काहीही पडलेले नसते. एक असेच दुर्दैवी चित्र वर्ध्यात पाहायला मिळाले आहे. दोन ट्रकच्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त ट्रकमधील द्राक्षाचा सडा रस्त्याच्या कडेला पडला होता. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी द्राक्षाची अक्षरश: लूट लावली होती.(Driver killed in Wardha accident, people snatch grapes from bags)

जिल्ह्यातील केळापूर जवळ हा अपघात झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात पुलगाव येथून १३ कि.मी अंतरावर असलेल्या केळापूर जवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास झाला.

रवी भास्कर जाधव, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जाधव यांचे वय २६ वर्ष आहे. जाधव हे बुलढाणामधील मेहेकर येथे राहतात. या अपघातात जखमी झालेल्या क्लिनरचे नाव प्रकाश सुखदेव लष्कर असे आहे. हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

रवी भास्कर जाधव हा एम.एच.२८ बी.बी.०९३३ क्रमांकाच्या ट्रकमध्ये द्राक्ष भरुन नागपूरकडे वेगाने जात होता. तेव्हाच समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असतानाच नागपूरकडून पुलगावकडे जाणाऱ्या यू.पी. ६० ए.टी. ५०८० क्रमांकाच्या ट्रकला त्याने जबर धडक दिली.

या अपघातात रवी भास्कर जाधव याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रकाश लष्कर हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. रात्रीच्या वेळी अपघात झाल्याने काही वेळापर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

तसेच ज्या ट्रकला धडक दिली होती. त्या ट्रकमधील चालक अमोल घुगरे आणि क्लिनर शेख गफ्फार, शेख रहीम हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्याचसोबत ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. पुलगाव पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंगी येथील रुग्णालयात पाठवला आहे.

महत्वाच्या बातम्या
दिल्लीत पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला, मोठ्या प्रमाणावर सापडली स्फोटके
चांदीच्या कड्यांसाठी नातवंडांनी आजीसोबतच केले भयानक कृत्य; घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण गाव हादरले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now