Share

सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिल्याने नक्की काय होतं? वाचून शॉक व्हाल

water

drinking water before brush  | अनेक लोकांना वेगवेगळ्या सवयी असतात. त्यामध्ये काही लोकांना अशीही सवय असते सकाळी सकाळी उठून पाणी प्यायचे. पाणी पिणे ही चांगली गोष्ट आहे. पण काही लोक हे सकाळी सकाळी ब्रश न करताच पाणी पितात हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो.

रात्रभर झोपल्यावर तोंडात घाण जमा होते. त्यामुळे सकाळी सकाळी पाणी पिणे चुकीचे आहे, असा समज लोकांमध्ये आहे. पण ते पुर्णपणे चुकीचे आहे. सकाळी सकाळी उपाशी पोटी पाणी पिणे हिच योग्य पद्धत आहे. सकाळी पाणी पिल्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते.

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि रोगांपासून वाचवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. पण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा शरीराला ७ ते ८ तास पाणी मिळत नाही. त्यामुळे त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी पाणी पिणे ही शरीरासाठी चांगली गोष्ट आहे.

तुम्ही जर ब्रश करण्यापूर्वी पाणी पिलं तर त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते. अनेकांना रात्री झोपेत असताना तहान लागते त्यामुळे ते पाणी पितात. कारण झोपल्यावर शरीर पाण्याचा वापर करत असतं. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर आधी पाणी प्यायला पाहिजे.

सकाळी उठल्या उठल्याबरोबर जर तुम्ही पाणी प्यायले. तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. असेही म्हटले जाते की, जर ब्रश करण्यापूर्वी तुम्ही पाणी प्यायले तर तुमच्या तोंडामध्ये बॅक्टेरिया जमा होत नाही. त्यामुळे तुमचे तोंड बॅक्टेरिया फ्री राहते.

तसेच सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायलाने तुमची पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे तुम्ही आजारांपासूनही दूर राहतात. तसेच सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची केस आणि त्वचाही चांगली राहते. त्यामुळे ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायचे सुद्धा अनेक फायदे आहे.

महत्वाच्या बातम्या-
मरता मरता आजोबांनी बदललं नातवाचं नशीब, भीक मागून जगणाऱ्याच्या नावावर होती २ कोटींची संपत्ती
vijay malokar : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकाने शिवसेनेला ठोकला रामराम
mukesh khanna : आज अर्ध्या कपड्यांवर नाचताय, उद्या कपडे न घालताच…; दीपिकाच्या बिकीनीवर शक्तीमान भडकला

ताज्या बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now