abdul sattar : राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शिंदे गटात नेते मंडळी चांगलेच चर्चेत आले आहेत. शिंदे गटातील नेते मंडळी तोंडाला येईल ते बोलत असल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे कुठतरी सत्तेचा माज शिंदे गटातील नेत्यांना आला असल्याच बोललं जातं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतच एक वक्तव्य केलं आहे.
राज्यात सर्वत्रच परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. बळीराजा पुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतं आहे. नेते मंडळी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान शिंदे गटातील नेते, कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे चर्चेत आले आहेत.
सत्तार यांनी केलेल वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याच संकेत मिळाले आहेत. सत्तार पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सत्तार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विचारलेल्या प्रश्नामुळे ते आता चर्चेत आले आहेत.
सत्तार यांच्या बीड दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, त्यांनी भर बैठकीत केलेलं एक वक्तव्य..! सत्तार अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी बीडच्या दौऱ्यावर आले. असता, यावेळी त्यांनी चक्क दारुच्या गप्पा सुरू केल्या. हा व्हिडिओही व्हायरल देखील झाला आहे.
त्याचं झालं असं की, दौऱ्यादरम्यान, अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले होते. तेव्हा जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी ‘चहा कमी पितो,’ असं म्हटलं. त्यावर सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला. त्यांच्या वक्तव्यानंतर तिथे एकच हशा पिकला.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर मोबाईलचा कॅमेरा सुरु असल्याचं पाहून सत्तार गोंधळले. त्यांनी मोबाईलचा कॅमेरा बंद करण्यास सांगितला. मात्र, असं असलं तरी देखील सत्तार यांचा “दारू पिता का?” हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. यावरून आता विरोधक देखील निशाणा साधत आहेत.
याचाच धागा पकडत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?,’ असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. ट्विटमध्ये सावंत यांनी म्हंटलं आहे की, “गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब, किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब, एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो, हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो.’
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर