गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक महानगर पालिकेच्या डॉक्टर सुवर्णा वाजे (dr suvarna wajes) यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस तपास करत आहे. तपासादरम्यान वेगवेगळे खुलासे होतं असल्याने या प्रकरणातील गुंता अधिकच वाढत चालला आहे. आता पुन्हा एकदा या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.
तसेच एकीकडे डॉ. सुवर्णा वाजे यांना ठार मारण्यातला प्रमुख संशयित आणि मास्टरमाईंड पती संदीप वाजे यांना अटक करण्यात आली आहे. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडाचे दररोज नवनवीन पैलू उलगडत असून, वाजे दाम्पत्यामध्ये होणाऱ्या कौटुंबिक कलहामागे केवळ वाजे यास दुसरे लग्न करावयाचे असल्याचे मूळ कारण वाजे यांनी लिहिलेली चिठ्ठी व मोबाइल संवादातून पोलिसांसमोर आले आहे.
मात्र पती संदीप वाजे हे पोलिसांपुढे कोणतीही माहिती देण्यास तयार होतं नसल्याने या प्रकरणाचा गुंता आता आधीच वाढला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी त्यांचा मोर्चा कुटुंबियांकडे वळला आहे. डॉक्टर सुवर्णा वाजे यांच्या कुटुंबाची पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी केली आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात संदीप वाजे यांच्या दोन मित्रांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. त्यामुळे आता या मित्रांकडून कोणता खुलासा होतोय का? याबाबत आता तपास सुरू आहे. तसेच पती संदीप भोवतीचा फास आणखी एकदा घट्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुवर्णा वाजे 25 जानेवारीच्या रात्री काम संपवून क्लिनिकमधून बाहेर पडल्या. त्या मुंबई-आग्रा महामार्ग परिसरालगत पोहचल्या. हे सारे त्यांच्या मोबाइल लोकेशनवरून समोर आले. आणि याच्याच आधारे तपास केला असता तपासात त्याच दिवशी रात्री डॉ. सुवर्णा वाजे ज्या वेळेस त्या भागात पोहचल्या होत्या, त्यावेळेस संदीपही तेथे असल्याचे समोर येत आहे.
सुवर्णा संदीप वाजे या मंगळवारी (दि.२५) रात्रीपासून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांच्या पतीने अंबड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल केली आहे. मात्र महामार्गालगत रायगडनगरजवळ वाजे यांची मोटार त्याच रात्री पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अमृता फडणवीस यांची खास पोस्ट; म्हणाल्या, “तू माझ्या हृदयात, मनात, श्वासात…”
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सात वाहन एकमेकांना धडकली; चार जणांचा जागीच मृत्यू, वाचा अपघाताचा थरार
अजब डिमांड! 82 वर्षाच्या आजीची ‘ही’ इच्छा ऐकून कुटूंबियांना बसला धक्का..
मोठी बातमी! आता वाहन चालवताना फोनवर बोलणे गुन्हा नाही, पण करावे लागेल ‘या’ नियमांचे पालन