आज प्रेमाच्या दिवशी कॉंग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या पतीबद्दल प्रेम व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. डॉ. राजीव सातव (Rajeev Satav) आणि डॉ. प्रज्ञा सातव यांचा विवाह 2002 मध्ये झाला होता. 19 वर्षांच्या संसारानंतर राजीव सातव यांच्या निधनाने दोघांची ताटातूट झाली, तरी आपल्या मनात पतीविषयीच्या प्रेम भावना कायमच राहणार असल्याचं प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केलं आहे.
काँग्रेसचे दिवंगत राज्यसभा खासदार डॉ. राजीव सातव यांचा मागच्या वर्षी 16 मे रोजी कोरोना संसर्गामुळे रोजी मृत्यू झाला. साहजिकच आज प्रेमाच्या दिवशी त्यांची पत्नी आणि विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Dr Pradnya Rajeev Satav) यांच्या मनात पतीच्या आठवणी दाटून आल्या आहेत. डॉ. प्रज्ञा सातव राजीव यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
Dear Rajeev Ji ,
On this Valentine’s Day wherever you are I want to tell you that ,
I loved you yesterday.
I love you today.
I will love you tomorrow.
I will love you forever.❤️❤️ ❤️ pic.twitter.com/SwzPYuQES5— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) February 13, 2022
डॉ. प्रज्ञा सातव यांनी केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस खासदार डॉ. राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. गेल्यावर्षी करोनामुळे १६ मे रोजी पुण्यात राजीव सातव यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच व्हॅलेंटाईन डे असून प्रज्ञा सातव यांनी राजीव सातव यांच्याबद्दलचं प्रेम त्यांच्या ट्वीटमधून व्यक्त केलं.
“प्रिय राजीव जी, तुम्ही कुठेही असाल तरी, या व्हॅलेंटाईन डे निमित्त मला तुम्हाला सांगायचे आहे की, माझे कालही तुझ्यावर प्रेम होते. आजही मी तुमच्यावर प्रेम करते. उद्याही मी तुमच्यावर प्रेम करत राहीन. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करत राहीन.” अशा आशयाचे ट्वीट प्रज्ञा सातव यांनी केले आहे.
दरम्यान, राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लावण्यात आली.
राजीव सातव राहुल गाँधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. राजीव सातव यांच्या निधनानंतर पत्नी प्रज्ञा सातव यांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवायचे ठरवले. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लावण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
प्रियांका चोप्राने सासरच्या पार्टीला पार केल्या बोल्डनेसच्या सगळ्या सीमा, पहा फोटो
भयंकर! घरात घुसलेल्या चोराला पकडून दिला विजेचा शॉक, व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेली होती अमृता राव, पुढे घडलं असं काही की जावं लागलं थेट हॉस्पिटलमध्ये
रवीना टंडनची मुलगी सर्व स्टार किड्सना देते टक्कर; तिच्या बोल्डनेसची होतेय सगळीकडे चर्चा, पहा फोटो