Share

सरकार नालायक असेल, तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांवर संतापले

udhav thackeray

सध्या राज्यात अनेक मुद्यांवरून राजकारण तापलं असून थेट मोदी सरकार विरुद्ध ठाकरे सरकार यांच्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. विरोधक प्रत्येक मुद्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील विरोधकांविरोधात दंड थोपडले आहेत.

शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव पूर्व येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानात महापालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी’ या नवीन धोरणाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना उद्धव ठाकरेंनी ठाकरे स्टाईलने तुफान टोलेबाजी केली.

‘अच्छे दिन देणार या थापा मारल्या गेल्या. ही थापेबाजी परवडणारी नाही. थापेबाजी एकदा, दोनदा, तीनदा चालेल. लोक सतत या थापा सहन करू शकत नाही,’ असं यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. जाणून घ्या सविस्तर ‘सर्वांसाठी पाणी’ या नवीन धोरणाचा शुभारंभ करताना काय म्हणाले मुख्यमंत्री..?

‘सर्वांसाठी पाणी हेच आपले धोरण आणि तो आपला धर्म आहे. आम्हाला पाणी देण्याच्या कामात राजकारण आणायचे नाही. मात्र घरात नळ देणाऱ्यांनी आश्वासनांच्या तोट्या दिल्या. अच्छे दिन देणार या थापा मारल्या गेल्या. ही थापेबाजी परवडणारी नाही. थापेबाजी एकदा, दोनदा, तीनदा चालेल. नागरिक कायम या थापा सहन करू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तसेच जनतेने आपल्याला दिले आहे. यामुळे सरकार नालायक निघत असले तर जनतेला जाब विचारण्याचा अधिकार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राजकारण करा; पण राजकारणाचा एक दर्जा असावा, असा टोला देखील त्यांनी लगावला. याचबरोबर राज्यात अलीकडे सुरू असलेल्या राजकरणावरून देखील मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान,  कोरोना विषाणूमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्थेची घडी आता पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. निर्बंध हटविल्यामुळे कार्यक्रम होऊ लागले आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गेले काही दिवस माणसात आल्यासारखे वाटत आहे. आपण माईकसमोर बोलू लागलो आहोत. याचबरोबर आपल्या मुंबईसाठी विविध योजना आणत असल्याच त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या
अखेर ठरलं! ‘या’ दिवशी आदित्य ठाकरे जाणार अयोध्या दौऱ्यावर; संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती
वसंत मोरेंच्या महाआरतीला पदाधिकाऱ्यांची दांडी; मोरे म्हणाले, तात्या जी भूमिका मांडतो, ती योग्यच असते
बाबो! विद्यार्थीनी थेट गुरुजींंनाच घेऊन पळाली; म्हणाली, आता जगणं-मरणं सर्व गुरुजींसोबतच
आज फक्त दिघे साहेबांमुळे मी इथे बसलोय; एकनाथ शिंदेंनी सांगितली २००० सालातील ‘ती’ भयानक घटना 

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now