शिवसेनेचा मराठवाड्यातला आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी गद्दार, बंडखोर म्हणून हिणवणाऱ्यांचं कानशील लाल करा, असा इशारा दिलाय. तसेच तुमच्या आसपास असणाऱ्या चांडाळ चौकडीला दूर करून आम्हाला मान सन्मानाने बोलवा, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. (Santosh Bangar was furious)
‘उद्धव ठाकरे आमच्या मनात आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. पण तुमच्या आसपास असणाऱ्या चांडाळ चौकडीला दूर सारा आणि मान सन्मानाने आम्हाला बोलवा. आम्ही विधानसभेवर भगवा असाच फडकवत ठेवू,’ असे वक्तव्य शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, ‘तुमच्या आसपास असणाऱ्या चांडाळ चौकडीने पक्ष मागे पडत आहे. हे तुम्हाला कळूच दिले नाही. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोबत येतील त्या सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा डौलात फडकताना दिसेल’, असे देखील बांगर म्हणाले.
शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदार त्यांच्या गटात हळूहळू जाऊन सामील झाले, शेवटी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असणारे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. त्यानंतर हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली विश्रामगृहात एकनाथ शिंदेंनी पाठवलेल्या पदाधिकाऱ्यांसमवेत एक बैठक पार पडली. त्या बैठकीत ठाण्याचे नगरसेवक प्रसाद काळे, राजेंद्र शिखरे विशाल पावसे, आ.संतोष बांगर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी बांगर यांनी हे वक्तव्य केले आहे.
सोबत येणाऱ्या प्रत्येकाला निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. हे सांगताना पुढे बांगर म्हणाले की, लवकरच एकनाथ शिंदे हिंगोलीमध्ये येणार आहेत. अशाप्रकारे शिवसेना विरूध्द शिंदे गटात सामील आमदारांचे वाक् युद्ध पुढेही रंगणार असल्याचे दिसते आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुलीला जेवन दिलं नाही म्हणून संतापली सुन, सासूसोबत केलं भयानक कृत्य, परिसरात खळबळ
शिंदे गटात गेल्याने पक्षाकडून विजय शिवतारेंवर मोठी कारवाई; बंडखोरांविरोधात शिवसेना आक्रमक
ललित मोदींपूर्वी सुष्मिता सेन या 6 उद्योगपतींची होती गर्लफ्रेंड, एक तर 14 वर्षांनी लहान