Share

कोरोनातून बरे झाल्यावर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थाचे सेवन नाहीतर होतील गंभीर परीणाम

omicron

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच कोरोनातून बरे झाल्यानंतर तुम्हीही तुमच्या आहाराची महत्वपूर्ण काळजी घ्यावी. याचसाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी. कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत.(Don’t go for less that your full potential)

संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्याचसोबत आणखी एका संकटाने तोंड वर काढले आहे. ते संकट म्हणजे ओमिक्रोन व्हेरिएंट. या ओमायक्रॉनने जगभरात दहशत निर्माण केली आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या रूग्णांच्या संख्येने चिंता जास्त वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज कोरोनाचे ३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. जरी बरेच लोक यातून बरे झाले असले, तरी मात्र शरीरात अशक्तपणा कायम राहतो. यासाठी तुम्हाला काही काळजी घ्यावी लागेल. ती कशी ते जाणून घ्या.

ओमिक्रोन व्हेरिएंटमधून बरे झाल्यानंतर अनेक दिवस अशक्तपणाची लक्षणे दिसून येत असतात. यावेळी आहाराची आवश्यक ती काळजी घेणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत कोणत्या पदार्थाचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थाचे सेवन करू नेये. याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

• बाहेरचे अन्न खाऊ नका
बरे झाल्यानंतरही काही रुग्ण बाहेरचे अन्न खातात. त्यामुळे त्यांना जास्त त्रास होतो. रुग्णांनी काही काळ बाहेरचे अन्न खाऊ नये. अशा वेळी फक्त घरी शिजवलेले अन्न खावे. कारण शिजवलेल्या अन्नामध्ये भेसळयुक्त पदार्थ नसतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत. यामुळे बाहेरचे अन्न खाऊ नका.

• फास्ट फूड खाणे टाळा
कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांनी काही काळ फ्रोझन पिझ्झा, कुकीज, केक, चॉकलेट यांसारख्या गोष्टींचे सेवन करू नये. कारण काही कंपन्या त्यात साखर आणि मीठ, मसाले वापरतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

• पॅकेट केलेले अन्न
कोविड -19 मधून बरे झाल्यानंतर, भेसळ केलेले आणि पॅकिंग केलेले अन्न खाऊ नये. यामध्ये यांत्रिक आणि रासायनिक प्रक्रिया केली जाते. जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या
ईडीची मोठी कारवाई! जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना अटक
अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट; शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता द्यायचा पोलीस बदल्यांची यादी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now