सोशल मीडियावर सध्या एका कीर्तनकाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित कीर्तनकार हे औरंगाबादचे असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी कीर्तनकारांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.
असे असतानाच आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या, भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कीर्तनकारांचा संभोग करतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ कोणीही फॉरवर्ड करू नये,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘कीर्तनकारांचा संभोग करतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ कोणीही फॉरवर्ड करू नका, तसेच मोबाईलमध्ये असेल तर डिलिट करा, तो व्हिडिओ पूर्णपणे स्पष्ट असल्यामुळे या दोन्ही कीर्तनकारांची बदमानी होतं आहे, असे तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या. ‘अश्लील व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि हे अश्लीलचाळे पाहणे म्हणजे विकृती आहे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल असे या कीर्तनकाराचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केला आहे. यावरून तृप्ती देसाई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
तृप्ती देसाई यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे संबंधित व्हिडिओ क्लिपसह निवेदन पाठवले आहे. सदर कीर्तनकारावर सायबर क्राईम कायद्यान्वये 66-A आणि 67-A आणि IPC 292 अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी गृहमंत्र्यांकडे केली.
तसेच याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘सदर कीर्तनकाराने एका महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केला असून त्याची ही कृती कीर्तनकार पेशा, महिलांची प्रतिष्ठा पायदळी तुडवणारी असल्याने या कीर्तनकारावर कठोर कारवाई करावी.’
महत्त्वाच्या बातम्या
मला आई व्हायचं आहे आहे माझ्या पतीला पॅरोल द्या, पत्नीच्या याचिकेवर न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय
महाराष्ट्राचा जावई असलेल्या या सुपरस्टारसोबत चित्रपट बनवणार राजामौली, बॉक्स ऑफिस पुन्हा हादरवणार
पैशासाठी विकली लाज! साऊथच्या ‘या’ अभिनेत्रींना देहव्यापार करताना रंगेहात पकडलं होतं, पहा फोटो
एकात्मतेचे दर्शन! मुस्लिम बांधवाना रोजा सोडण्यासाठी उघडले बाराशे वर्ष जुने मंदिर