बीड | प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असते आपल्या मुलाने मोठे व्हावे, मोठ्या सरकारी पदावर असावे. पण कुणाकडून ते स्वप्न पूर्ण होईलच अस नाही कारण जो तो ज्या त्या क्षेत्रात बाप असतो. तर काही मुल काहीच न करत आई-वडिलांच्या जीवावर उदरनिर्वाह भागवतात. खूप वेळा आपण म्हणत असतो गरीबाच्या लेकारांनाच परिस्थितीची जाणीव असते तेच आई बापाच नाव मोठ करतात.
पण हे वाक्य काही खोटे नाही कारण आता अशीच एक उर भरून आणणारी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील तरुणाने हा पराक्रम केला आहे. आई-वडील दोघेही मोलमजुरी करतात. त्यामुळे आपण शिकून मोठं व्हायचं स्वप्न या घरातील तरुणाने पाहिले. आई-वडिलांना कामात मदत तर केलीच पण स्वतः कृषी दुकानात काम करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
नुकत्याच झालेल्या पीएसआय (PSI) परीक्षेतून या पट्ठ्याने दाखवून दिले आहे. बीड जवळच्या शिदोड गावातील ज्ञानेश्वर देवकते हा तरुण पीएसआय झाला. हलाखीच्या परिस्थितीतही त्याने आपले शिक्षण बंद पडू दिले नाही. जिद्दीच्या आणि कठीण परिश्रमाच्या जोरावर तो आज पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने २४८ गुण मिळवले आहेत. ज्ञानेश्वरचे आई वडील ऊसतोड मजूर आहेत. स्वतःच्या तीन एकर शेतीतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशा परिस्थितीतही त्याच्या आई वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही. खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वरने पाच वर्ष अथक परिश्रम घेतले.
घरची परिस्थितीत हलाखीची असल्याने त्याने बीड मध्येच राहून आपला अभ्यास पूर्ण केला. त्याच्या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्याचे कौतुक होताना दिसत आहे. एवढेच नाही तर घोड्यावर बसवून ज्ञानेश्वरची मिरवणूक देखील काढण्यात आली. ज्ञानेश्वरकडे दहावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने कधी हमाली केली, तर कधी शेतात काम केले. ज्ञानेश्वर पोलीस व्हावा यासाठी त्याच्या आई-वडिलांनी देखील शेतामध्ये मोलमजुरी करून त्याला पैसे पुरवले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तो दिवसभर शेतात काम करायचा. आणि त्यानंतर रात्री मिळालेल्या वेळेत अभ्यास करायचा. कारण पोलीस होण्याची त्याची पहिली संधी थोडक्यात चुकली होती. सहा गुण कमी पडल्याने तो अधिकारी होऊ शकला नाही मात्र, तरीही त्याने जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. रडत न बसता, खचून न जाता त्याने पुन्हा शून्यापासून सुरुवात केली. आणि आज त्याचे खाकी वर्दीचे स्वप्न त्याने पूर्ण केले.
ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेसाठी आपले राहते घर आणि गाव सोडून शहरामध्ये अभ्यासासाठी जावे लागते. पण खूप कष्ट करून स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवणे नक्कीच खायचे काम नाही. मात्र आपल्याच गावात राहून आई-वडिलांना कामात मदत करून, IPS अधिकारे होणे यासाठी खरी जिद्द लागते. आणि हाच आदर्श बीडमधील ज्ञानेश्वर देवकतेने तरुण पिढीसमोर ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बुम बुम बुमराहने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले अनोखे त्रिशतक
वीकेंडला काश्मिर फाईल्सने केली जोरदार कमाई, फक्त तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
आमिर खान आणि जुही चावलावर झाली होती दगडफेक; ‘असा’ वाचवला होता स्वत:चा जीव
मैत्री असावी तर अशी! स्टीव्ह वॉने मित्राच्या अस्थी काशीला येऊन केल्या विसर्जित, कारण वाचून भावूक व्हाल