देशात अनेक श्रीमंत देवस्थाने आहेत. त्यामध्ये शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचा देखील समावेश आहे. देशभरातून अनेक भाविक या ठिकाणी येऊन मौल्यवान गोष्टी दान म्हणून देतात. मात्र, आता एका भाविकाने साईचरणी जी गोष्ट दान केली त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
एका भाविकाने साईचरणी चक्क पाच हजार किलो केशर आंब्याचे दान केले आहे. त्यामुळे काल सर्व साईभक्तांना आमरसाची मेजवानी देण्यात आली. इतक नव्हे तर आंब्याची संख्या जास्त असल्याने पुढेच ३ दिवस प्रसाद म्हणून आमरसाची मेजवानी दिली जाणार आहे.
तसेच, तीन दिवस या आंब्यांच्या रसाचे प्रसाद भोजन साईभक्तांप्रमाणेच, दोन्ही रुग्णालय येथील रुग्णांना तसेच अनाथाश्रम, वृद्धाश्रम आदी ठिकाणी देण्यात येणार आहे. पुण्यातील येथील दीपक करगळ नामक साई भक्ताने हे आंबे साई संस्थानाला दान केले आहे.
साई चरणी भक्त सोनेचांदी पैशाच्या स्वरुपात आणि वस्तुच्या स्वरुपात दान चढविले जातात. तर अनेक भक्त साईबाबा संस्थान मार्फत चालविल्या जात असलेल्या प्रसादालसाठीही अन्नदान करण्यासाठी पैसे दान करत असतात. सध्या आंब्याचा सीझन सुरु आहे.
आंब्याचा सिझन सुरू असल्यामुळे, साईभक्तांना आमरसाची मेजवानी मिळावी यासाठी पुण्याचे साईभक्त दिपक गर्ग यांनी त्याच्या आमराईतीतील ५ हजार किलो केशर आंबे दोन ट्रकमध्ये भरुन शिर्डीत पाठवले. या अंब्यापासून बनविलेला स्वादीष्ट आमरस गुरुवारी दिवसभर भक्तांना भोजनात वाढण्यात आले.
आता पुढेच तीन दिवस देखील भक्तांना साई प्रसाद म्हणून भोजनात आमरस दिला जाणार आहे. माहितीनुसार, हे आंबे सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले आहेत. सुमारे ४ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ५००० किलो केशर आंबे देणगी स्वरुपात संस्थानच्या श्री साईप्रसादालयात दिलेले आहे.