केजीएफ(KGF): सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे की, केजीएफ-२ फेम यशने नुकतीच अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये देणगी देण्याची घोषणाही केली आहे. यशचा एक फोटोदेखील सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो क्रीम कलरच्या धोती-कुर्त्यामध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने लाल रंगाची शॉलही घेतली आहे.
या फोटोला कॅप्शन दिले आहे की, आयोध्यामध्ये राम मंदिर उभारणीसाठी यशनं ५० कोटी दान केले. पण ही पोस्ट फेक आहे. याबाबतीतील सत्य समोर आले आहे. हा फोटो अलीकडचा नसून एप्रिलमधील(२०२२)आहे. यशने त्याचा चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ रिलीज होण्यापूर्वी तिरुपती, आंध्र प्रदेश येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली होती.
https://www.facebook.com/santosh.tripathi.98499/posts/2256257671217018
तिथे त्याने चाहत्यांसोबत फोटोही शेयर केले होते. यशला कन्नड चित्रपटांचा मोठा स्टार मानले जात होते, पण नंतर केजीएफने खूप प्रसिद्धी मिळवली. ‘केजीएफ १’ आणि ‘केजीएफ २’ या चित्रपटाच्या रिलीजनंतर तो भारतभर लोकप्रिय झाला. ‘केजीएफ चॅप्टर १’ २०१८ मध्ये रिलीज झाला आणि ‘केजीएफ चॅप्टर २’ २०२२ मध्ये रिलीज झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘केजीएफ २’ ने रिलीजच्या चार दिवसांत जगभरातून जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यशने जर राम मंदिरात जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी देण्याची घोषणा केली असती, तर त्यासंदर्भातील बातमी प्रकाशित झाली असती. पण असे काहीही झालेले नाही. अनेक दक्षिण भारतीय कलाकारांनी यासाठी देणग्या दिल्या आहेत.
निर्माते विजय किरगंदूर यांनी माहिती दिली की, केजीएफ ३ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी यशच्या केजीएफ चॅप्टर-२ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यशशिवाय यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांनी काम केले आहे. केजीएफ ३ या चित्रपटाचं शूटिंग ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू होणार असून हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होईल.
ते म्हणाले, ‘दिग्दर्शक प्रशांत नील सध्या सालारच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ३० ते ३५ टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे.’ केजीएफ-३ ची यशचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. केजीएफचे दोन्ही चॅप्टर अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. निर्मात्यांना आशा आहे की, केजीएफ ३ सुद्धा असाच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल.
महत्वाच्या बातम्या
Madhypradesh: सेल्फीचा मोह जीवावर बेतला! तब्बल १० जण गेले धबधब्यात वाहून; मुख्यमंत्र्यांनाही बसला धक्का
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे अजून किती दिवस बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना ब्लॅकमेल करणार आहात?”
BIS Care app: आनंदाची बातमी! सणासुदीच्या दिवसात सोने चांदीच्या दरात तुफान घसरण; जाणून घ्या नवे दर
Crime : सुरक्षारक्षकांवर हल्ला करणाऱ्या सिरीयल किलरची दहशत! ७२ तासांत घेतला तिघांचा जीव