Share

भन्नाट ऑफर! एक बाटली रक्त द्या आणि एक किलो चिकन घ्या, रक्तदान करण्यासाठी लोकांना दिली प्रेरणा

blood

रविवारी, 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कलाकारांची अनोखं अभिवादन केलं. कुणी स्टोन आर्ट काढलं तर कुणी आपट्याच्या पानावर चित्र साकारलं आहे. तर कोणी रांगोळी काढून बाळासाहेब ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. (donate blood and take a kilo of chicken)

तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्या उल्हासनगर युनिटतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पक्षाकडून लोकांना रक्तदानासाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळावी, अशी विचित्र ऑफरही देण्यात आली होती. एक बाटली रक्त द्या आणि त्याबदल्यात एक किलो चिकन घ्या, अशी ऑफर होती.

या ऑफरची राज्यभर चांगलीच चर्चा आहे. स्थानिक नागरी संस्थेतील पक्षाचे नेते धनंजय बोडारे यांनी सांगितले की, शिबिरात 65 बाटल्या रक्त जमा करण्यात आले. रक्तपेढीच्या मदतीने आयोजित शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऑफरनुसार एक किलो चिकनही दिल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, एका सामान्य शिवसैनिकांनी स्वखर्चातुन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभारले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील इटग्याळ या गावात वातव्यास असणाऱ्या व शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या संजय इटग्याळकर या तरुणास बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व,मराठी माणूस व हिंदुत्व यासाठीचा त्यांचा लढा या विषयी नेहमीच आकर्षण राहिले. आणि तो शिवसेनेकडे ओढला गेला. बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी व शिवसेना बाळासाहेबांना जवळून पाहता यावे त्यांच्या सानिध्यात राहता यावे यासाठी त्याने 2000 मध्ये थेट मुंबई येथे जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, उदरनिर्वाहासाठी संजय देगलूर, मुखेड, उदगीर याठिकाणच्या तरुणांना कराटे प्रशिक्षण देतात. पण कोरोना व लॉकडाऊनमुळे तेही बंद झाले. या काळात त्यांना प्रचंड आर्थिक आवक बंद पडली. त्यासाठी त्यांनी वडिलोपार्जित 2 एकर जमीन विक्री करून व तब्बल 14 लाख रुपये खर्च करून बाळासाहेबांचे सुंदर व सुबक असे मंदिर उभारलं आहे.

विशेष बाब म्हणजे जवळपास एक एकर परिसरात विस्तीर्ण अशा जागेत संजय इटग्याळकर यांनी हे मंदिर उभारले असून याठिकाणी मोफत कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘महाराष्ट्राला “मद्यराष्ट्र” करण्याकडे वाटचाल, हे सरकार जनतेचे आहे की दारुड्यांचे’
फडणवीसांची शिष्टाई अपयशी! उत्पल पर्रिकरांचा पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल
प्रजासत्ताक दिनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली अनाथ मुलांना भेट, दिलेली भेटवस्तु पाहून कौतूक वाटेल
बलात्कार झाल्यानंतर तिचे केस कापले आणि तोंड काळे करून, हार घालून काढली धिंड; वाचून धक्का बसेल

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now