Share

डॉमिनोज पिझ्झा गर्लला लेडी गॅंगकडून बेदम मारहाण, व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

crime

इंटरनेटमुळे संपूर्ण जग आपल्या मुठीत आलं आहे. दररोज सोशल मिडियावर हजारो व्हिडिओ, फोटो व्हायरल होतं असतात. यातील अनेक व्हिडिओ हे सकारात्मक असतात. तर अनेक व्हिडिओ आपली झोप उडवणारे असतात. तर काही हटके, विनोदी व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होतं असतात.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. मुलींच्या मारहाणीचा हा व्हिडिओ आहे. डॉमिनोज पिझ्झा गर्लला चार मुलींनी मिळून लाठीकाठीने मारहाण केली. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. मोठ्या प्रमाणत शेयर देखील हा व्हिडिओ होतं आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय..? हा व्हिडीओ मध्यप्रदेश मधील इंदौर येथील असल्याची माहिती मिळत आहे. मारहाण झालेली मुलगी ही पिझ्झा डिलिव्हरी पर्सन म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.  पीडित तरुणी आपल्याकडे पाहत होती आणि म्हणून तिला मारहाण केली, असा आरोप चार मुलींनी केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे..? व्हायरल व्हिडिओमध्ये मुलींची जबर भांडण पाहायला मिळत आहे. डॉमिनोज पिझ्झा गर्लला चार मुलींनी जबर मारहाण केली आहे. व्हिडिओ पाहून तुमच्या देखील काळजाचा ठोका नक्की चुकेल. पीडित तरुणी लोकांना मदतीची याचना करत होती मात्र कोणीही तिला मदत करताना दिसत नाहीये.

 

दरम्यान, ती पीडिता मोठमोठ्याने ओरडत आहे. पण तिचे कोणीही ऐकत नाही. व्हिडिओत दिसत आहे की, आजूबाजूला काही लोक जमलेले आहे, मात्र तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाहीये. याचाच फायदा त्या चार मुलींनी घेतला. आणि त्या पीडित तरुणीला त्यांनी काठीने मारले.

सध्या सर्वत्र लेडी गॅंगच्या या हाणामारीच्या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुण्याच्या ऋतुराजची ‘तुफान’ फटकेबाजी, मारले पाच चेंडूत पाच चौकार; पाहा व्हिडिओ
प्रसिद्ध अभिनेत्रीला १३-१४ वर्षांच्या मुलांनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, धक्कादायक कारण आले समोर
सामान्य नागरीकाने केली माळशेज घाटातील लुटारू पोलिसांची पोलखोल, व्हिडीओ होतोय व्हायरल
काश्मिरी पंडितांचे खून अन् गाय तस्करीवेळचं माॅब लिंचिंग यात काहीही फरक नाही; साई पल्लवीचे बेधडक वक्तव्य

क्राईम इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now