Share

घरगुती सिलेंडरचा भडका! तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी वाढवल्या किंमती, सामान्यांच्या खिशावर ताण

महागाईने कंबरडे मोडणाऱ्या जनसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सिलेंडर आता ५० रुपयांनी आणखी महाग झाला आहे. हे नवीन दर आजपासून लागू करण्यात येणार आहेत.

आजपासून देशांतर्गत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरातही १८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १४.२किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीत १०५३ रुपयांना मिळणार आहे.

तर दुसरीकडे, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्याची किंमत प्रति सिलेंडर ८.६० रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना काहीसा दिलास मिळाला आहे. घरगुती सिलेंडरच्या किमती वाढण्याची आणि व्यवसायिक सिलिंडरच्या किंमतीत घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१ जुलैला व्यवसायिक सिलेंडर मध्ये १९८ रुपयांची घट करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा ९ रुपयांनी घट करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या नव्या दराच्या घोषणेनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,०१२ रुपये मोजावे लागणार आहे.

जूनच्या आधी गेल्या ३महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत होती. तीन महिन्यानंतर जूनमध्ये दर कपातीची पहिली वेळ होती. दरम्यान, रशिया-यूक्रेन विवादाचा फटक्यामुळे कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाली होती.

१ मेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. एक एप्रिलला २५० व मार्च महिन्यात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडर दराच्या कपातीनंतर घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर घटण्याची अपेक्षा आहे. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किंमती घटल्यामुळं हॉटेल, ढाबा तसेच रेस्टॉरंट चालकांना थेट लाभ होणार आहे.

इतर आर्थिक

Join WhatsApp

Join Now