Share

तुमच्या बापाची जहागीर आहे का? शिंदे गटात प्रवेश करताच रावसाहेब दानवेंनी खोतकरांना सुनावले

शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीत आता अंतर्गत वादाला सुरुवात झाली आहे. हा वाद लोकसभेच्या एका जागेवरून झाला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभेच्या जागेवरून शिंदे गटातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांना चांगलंच सुनावलं आहे.

अर्जुन खोतकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र पहिल्याच दिवशी त्यांना त्यांच्या पारंपारिक राजकीय शत्रूच्या सामना करावा लागला आहे. येत्या काळात भाजप आणि एकनाथ शिंदे गटात जागांवरुन वाद होऊ शकतात अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

एकेकाळचे कट्टर विरोधक केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे आणि माजीमंत्री अर्जुन खोतकर आता एकनाथ शिंदे गटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले. खोतकर यांनी जालना लोकसभेची जागा मागितली. त्यावरून दानवे चांगलेचं संतापल्याचं दिसून आलं.

खोतकर म्हणाले होती की, खुद्द दानवेंनी मला लोकसभेला समर्थन द्या, तुम्हाला दुसरी जागा देता येईल. कारण ही जागा भाजपची असून मीच सध्या इथला विद्यमान खासदार आहे, असं म्हटलं. त्यावर मी त्यांना म्हटलं की, हा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाका. शिवाय, तुम्ही अनेक वर्षे इथून लढलात आता ती मला लढवू द्या असं मी त्यांना म्हटल्याचही खोतकर यांनी सांगितलं.

दरम्यान खोतकर यांच्या जालना लोकसभेच्या जागेवरून रावसाहेब दानवे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. दानवे म्हणाले की, जालना लोकसभेची जागा रावसाहेब दावनेच्या बापाची जहागिरी थोडीच आहे. याच्यावर अधिकार रावसाहेब दानवेंचा थोडाच आहे.

उद्या आमच्या पक्षाचे सरचिटणीस मुलतानी हे देखील तिथून उभे राहू शकतात. ते आणि मी खुर्च्या टाकून जागांचं वाटप करत बसलो तर झालंच. तो काय जालन्यातला पक्ष आहे का असा सवाल करत भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now