Tukaram Munde : आपल्या शिस्तबद्ध कामासाठी आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये पहायला मिळत आहेत. त्यांनी आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णलयांमध्ये सरप्राईज भेटी द्यायला सुरुवात केली आहे.
काल रात्री अचानक दीडच्या सुमारास आळंदी, वाघोली भागातील रुग्णालयांना त्यांनी भेटी दिल्या. त्या ठिकाणी डॉक्टर हजर असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई टळली मात्र रात्रीच्या वेळी रुग्णालयात डॉक्टरांनी हजर राहिलेच पाहिजे. २४ तास उत्तम सेवा द्यावी. त्यासाठी डॉक्टरांकडून उत्कृष्ट कामाची अपेक्षा यावेळी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली आहे.
अशा प्रकारची धाडसत्रे राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये आरोग्य उपसंचालक, आरोग्य अधिकारी यांकडून टाकली जात आहेत. कामात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर, रात्रीच्या वेळी हजर नसणाऱ्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे आरोग्य विभागाचे संचालक तुकाराम मुंडेंनी स्पष्ट केले आहे.
आपल्या कारकिर्दीत अनेक विभागात शिस्तीसाठी आणि बेधडकपणे जनहिताचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे आता आरोग्य सेवा विभागात दाखल झाले आहेत. आरोग्य विभागात अनेकांना त्यांच्या नावानेच धडकी भरत असल्याचे दिसते. बीडच्या डॉक्टरांनी तर नोटीस काढत कर्मचाऱ्यांना वेळेवर हजर राहणे, ड्युटीच्या वेळी कामासाठी असलेल्या गणवेशातच येणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सरप्राईज व्हिजिटमध्ये तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशा सूचनाच दिल्या आहेत.
आरोग्य भवनमध्ये तुकाराम मुंडे यांनी डॉक्टर रामास्वामी.एन यांच्याकडून आरोग्य विभागातील संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर वेगाने काम करण्याचा धडाकाच त्यांनी लावला आहे. आरोग्य ही अत्यावश्यक सेवा असून ती उत्तम प्रकारे लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यासाठी उत्कृष्ट कामाची अपेक्षा संबंधित आरोग्य विभागाकडून व्यक्त केली.
तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द वादळी ठरली आहे. ते मुंबईत असताना महानगरपालिकेत त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला होता. पुण्यात देखील पीएमपीएलचे आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांचे स्थानिक अधिकारी व राजकीय नेत्यांसोबत वाजले होते. परंतु तुकाराम मुंडे ज्या विभागात जातील त्या ठिकाणी पारदर्शक कामासाठी कटिबद्ध राहतात. त्यामुळेच तुकाराम यांचा धाक ते जातील त्या विभागात कायम असतो. आरोग्य विभागात देखील तेच दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: KBC मध्ये झाली अचानक अशा व्यक्तीची एन्ट्री की अमिताभ बच्चन झाले भावूक, थेट मारली मिठी
shivsena : ३५ वर्ष घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले की घराला सोन्याचे पत्रे लावण्याएवढा मलिदा खाल्ला?; शिवसेना नेत्याचा शिंदे गटावर घणाघात
Amit Shah : ‘या’ दोन बड्या नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; दसरा मेळाव्यानंतर राजकीय हालचालींना वेग