लांबसडक केसामुळे स्त्री – पुरुष दोघांचेही सौंदर्य वाढते. आपण सर्वच जण आपल्या केसांची खूप काळजी घेत असतो. मात्र हेच आपला जीव देखील घेऊ शकतात. यामुळे शक्यतो आपण आपल्या घरातील लहान मुलांना जपत असतो. नकळतपणे लहानमुळे मुले तोंडात केस घालतात. यामुळे पुढे जावून पोटाचे आजार होण्यास सुरुवात होते. (doctors remove huge hairball from 6 year old girls stomach)
अशीच एक धक्कादायक घटना हरियाणातील पंचकूलामध्ये घडली आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करून ६ वर्षांच्या मुलीच्या पोटातून जवळपास दीड किलो केसांचा गुच्छ काढला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
सर्जन विवेक भादू आणि त्यांच्या टिमनं या मुलीचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले. आता तिची प्रकृती स्थिर असून निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. ऑपरेशन व्यवस्थित पूर्ण करून मुलीचा जीव वाचवल्याबद्दल मुलीच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान, पंचकूलातील मदनपूर या गावातील रहिवासी असलेल्या ६ वर्षांच्या मुलीला खूप दिवसांपासून पोटदुखीची तक्रार जाणवत होती. वेदना असहय्य झाल्यानं मुलीचे नातेवाईक पंचकूला सेक्टर ६ च्या रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी या चिमुरडीच्या काही चाचण्याही करून घेतल्या. त्यातून समोर आलं की पोटात काहीतरी अडकल्यानं हा त्रास जाणवत आहे.
काही दिवसांपूर्वी झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातून असेच एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले होते. येथे शस्त्रक्रिया करून 17-वर्षीय मुलीच्या पोटातून 7 किलो वजनाचा एक केसांचा गोळा काढण्यात आला होता. मुलीवर ऑपरेशन करणार्या सर्जनने सांगितले, की केसांचा हा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला गेला आहे. हे एक अतिशय गुंतागुंतीचे ऑपरेशन होते कारण केसांनी या मुलाच्या पोटाचा बराचसा भाग व्यापला होता.
महत्त्वाच्या बातम्या
अजितदादा ऍक्टीव्ह नसल्याने कार्यकर्ते नाराज? अजित पवार म्हणाले, त्यांना खुश करण्यासाठी..
टिपू सुलतानच्या नावाचा वाद पेटला; भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक
राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला खास,सुदेश भोसलेंच्या गाण्यासह ‘या’ गोष्टींचा होता समावेश
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेआधीच टिम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू झाला बाहेर