Share

डॉक्टरांनी घडवले माणुसकीचे दर्शन, निराधार वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन केले मोफत उपचार

डॉक्टर

श्रीगोंदा शहरातील प्रभावती भिंगारदिवे या वृद्ध निराधार महिलेचे पाय आणि हाताचे हाड मोडले होते. त्यामुळे ती वृद्ध महिला जीवघेण्या वेदनांचा सामना करत होती. शहरातील हाडांचे तज्ञ डॉ. अनिल शिंदे यांनी, त्या वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन तिच्यावर मोफत उपचार केला.( Doctors performed a vision of humanity)

प्रभावती यांना ना घर ना दार अशातच त्यांचा १ पाय मोडल्यामुळे त्यांना अपंगत्व आले होते. अग्निपंख फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांची परिस्थिती समजून घेऊन, त्या वृद्ध महिलेला पत्र्याचे शेड उभे करण्यासाठी १० हजार रुपयांची मदत केली.

शेडचे काम चालू असताना भिंगारदिवे यांचा एक पाय आणि हात एकाचवेळी मोडला. त्यानंतर भिंगारदिवे यांच्याकडे मोफत उपचार आणि स्वस्त धान्यासाठी रेशनकार्ड नव्हते. यामुळे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी एकाच दिवसात त्यांना रेशनकार्ड देण्याचे सहकार्य केले आहे.

भिंगारदिवे यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचार झाले नाहीत. त्यानंतर त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र काहीही फायदा झाला नाही. भिंगारदिवे या श्रीगोंद्यात आल्या आणि दरवाजा नसलेल्या झोपडीत जीवघेण्या वेदनांशी झुंज देऊ लागल्या. या वृद्ध महिलेच्या वेदनादायी दुखण्याकडे डॉ. अनिल शिंदे यांचे लक्ष गेले. त्यांनी झोपडीत जाऊन भिंगारदिवे यांच्या पायावर प्लास्टर केले.

त्याचसोबत अग्निपंखचे विश्वस्त मधुकर काळाने, अरिहंत उद्योग समूहाच्या प्रतिभा गांधी यांनी औषधासाठी मदत केली. भिंगारदिवे यांच्या अपूर्ण झोपडीचे काम प्रशांत देसाई यांनी पूर्ण केले. महावितरणाचे शाखाभियंता काळे यांनी वीज देण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली. डॉ. अनिल शिंदे म्हणाले की, मी जीवनात गरिबी काय असते हे अनुभवले आहे. त्यामुळे मी वृद्ध आजींच्या झोपडीत जाऊन त्यांना मोफत उपचार दिला.

श्रीगोंदा तालुक्यातील अनाथ निराधार, भूमिहीन इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थांना मोफत उपचार देण्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यासाठी मुख्याध्यापकाची शिफारस आवश्यक आहे, असेही डॉ. अनिल शिंदे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्पेनमध्ये डंका; प्रभावशाली अभिनेत्रींच्या चर्चासत्रात झाली सहभागी, म्हणाली..
“याद राखा…! मुंबईत फक्त शिवसेनाच दादा, आम्हीच मुंबईत दादागिरी करणार”

 

आरोग्य

Join WhatsApp

Join Now