Lumpy skin disease : जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाने हाहाकार माजवला आहे. जनावरांमध्ये दिवसोंदिवस या रोगाचा संसर्ग वाढत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जनावरांच्या आरोग्याला हानी पोहचवणाऱ्या या रोगाची प्रतिबंधक लस देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. मात्र याबाबत मोठी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.
लसीकरणाच्या नावाखाली खाजगी डॉक्टर शेतकऱ्यांकडून जनावरांना लस देण्याचे जास्त पैसे उकळत आहेत. याबाबत सातारा भागातून काही शेतकऱ्यांनी तक्रार केल्याचे समोर येते. साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लम्पी चर्मरोगाचा संसर्ग झाला आहे. असंख्य जनावरे या रोगाने बाधित आहेत.
अशा परिस्थितीत शेतकरी खाजगी डॉक्टरकडून लवकरात लवकर आपल्या जनावरांना लस देत आहेत. मात्र त्यांच्याकडून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. एक लास देण्यासाठी १०० ते २०० रुपये घेण्यात येत आहेत.
वास्तविक ७०० ते ८०० रुपये किंमतीत बल्ब औषधाची एक बॉटल येते. त्यात २५ ते ३० जनावरांचे लसीकरण होते. म्हणजेच एक लस देण्याचा साधारण खर्च २५ ते ३० रुपये येतो. खाजगी डॉक्टर मात्र १०० ते २०० रुपये घेत आहेत. याबाबत काही शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे.
या चर्मरोगामुळे काही हजार, लाखाच्या घरात ज्या जनावरांची किंमत आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळेच भयभीत झालेले शेतकरी खाजगी डॉक्टरांची मदत घेतात. मात्र जनावरांना यापासून वाचवण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. गुरे बांधत असलेल्या गोठ्यात स्वच्छता राखावी. जनावरास चर्मरोगाची लक्षणे आढळून आल्यास पशुवैद्यकीय संस्थेशी लगेच संपर्क साधावा.
लम्पी चर्मरोगामुळे जनावराच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. लसिकाग्रंथीला सूज येते. तोंडात व्रण आल्याने चारा खायला त्यांना त्रास होतो. काही जनावरांना पायाला सूज येऊन ते लंगडत चालतात. जनावरांची दृष्टी या रोगामुळे बाधित होते. यामुळे हा रोग जनावराला होऊ नये. यासाठी त्याचे लसीकरण करून घेणे, योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या-
politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का; ऐतिहासिक दुर्गाडी गडावरील देवीच्या उत्सवाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
dussehra melava : अखेर ठरलं! दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला? पालिकेने एका वाक्यात केला विषय ‘क्लोज’
Gajanan Kirtikar : पुन्हा भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंना विनंती करणार; शिवसेनेतील बड्या नेत्याचे वक्तव्य