Share

माझा बाप कोण आहे माहितीय का? अशी धमकी देणारांनो मिझोरममधील हे फोटो एकदा पहाच…

वाहतुकीचे नियम पाळायला अनेकांना कंटाळवाणे वाटते. उगाच घाई करुन नियम मोडून लोक गाडी चालवतात. त्यामुळे रस्त्यावर इतर वाहनांची गर्दी होते. अनेक वेळा अपघात होतात. मात्र हेच वाहतुकीचे नियम पाळल्याने किती आनंद आणि वेळ वाचू शकतो याचे उत्तम उदाहरण मिझोराम मधून येते. आनंद महिंद्रा यांनी देखील याचे कौतूक केले आहे.

वाहतूक नियम आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत. परंतु आपल्यापैकी बहुतेकजण हे नियम केवळ चलन टाळण्यासाठी पाळतात. भारताच्या रस्त्यांवर प्रत्येकजण घाई-घाईत दिसतो. अशा परिस्थितीत तो वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसवतो. कुणी ट्रॅफिक सिग्नल तोडतो, कुणी चुकीच्या बाजूने चालायला लागतो, तर कुणी वेगमर्यादा व्यर्थ ठेवतो.

पकडल्यानंतर वेगवेगळी कारणं सांगून ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी ट्राफिक पोलीस आणि नियम तोडणाऱ्या चालकात अनेकदा ऐकायला भेटते की, ‘तुला माहीती नाही माझा बाप कोण आहे? वाहन चालकांकडून नेहमी ही धमकी दिली जाते.

पण मिझोराममधून एक चित्र समोर आले आहे, जे पाहून तुम्ही म्हणाल, खरच नियमांचे पालन करणे किती आनंददायी आहे. @SandyAhlawat89 नावाच्या युजरने 1 मार्च रोजी हे चित्र ट्विटरवर शेअर केले होते. या फोटोला पाहुन आनंद महिंद्रा यांनी देखील रिट्विट करत मिझोराम वाहतुकीचे कौतुक केले.

SandyAhlawat89 नावाच्या युजरने या फोटोच्या कॅप्शनमध्ये जे लिहिले की, ‘अशी शिस्त मी फक्त मिझोराममध्ये पाहिली आहे. कोणतीही फॅन्सी कार नाही, अहंकार नाही, रस्त्यावरचा राग नाही, हॉर्नचा आवाज नाही, रेटारेटी नाही आणि माझा बाप कोण आहे तुला माहिती का? अशी धमकी देणारे कोणी नाही. आजूबाजूला शांतता आहे…!’

यावर, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी संदीपचे ट्विट रिट्विट केले आणि लिहिले की, किती छान चित्र आहे. एकाही वाहनाने रस्त्याची मधली बोर्डर ओलांडली नाही. मजबूत संदेशासह हे एक प्रेरणादायी चित्र आहे. आपले जीवन चांगले करणे आपल्यावर अवलंबून आहे. नियमानुसार जा..असे त्यांनी ट्विट केले आहे.

https://twitter.com/anandmahindra/status/1498558839938977792?t=xfvfhtIV2kbna3q4SlujWw&s=19

इतर

Join WhatsApp

Join Now