या वर्षातील यशस्वी चित्रपटांपैकी एक, SS राजामौली दिग्दर्शित साऊथचा चित्रपट Rise Roar Revolt (RRR), 25 मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटात राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) मुख्य भूमिकेत आहेत. म्हटलं जात आहे की, दोन खऱ्या आयुष्यातील नायकांवर हा चित्रपट आधारित आहे ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडल होत.
प्रसिद्ध क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला काल्पनिक स्वरूप देण्यात आल्याचे दिग्दर्शक राजामौली यांनी सांगितले. या क्रांतिकारकांच्या जीवनाविषयी फारशी माहिती नाही, पण या काल्पनिक कथेतून त्यांच्या आयुष्यात काय घडले आणि दोघे एकत्र आले असते तर काय घडले असते, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे ते सांगतात.
अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अंतर्गत येणाऱ्या भागातील आदिवासींच्या वन हक्कांसाठी लढा दिला. असे म्हटले जाते की 1882 मध्ये भारताच्या ब्रिटीश सरकारने मद्रास वन कायदा पास केला आणि स्थानिक आदिवासींना जंगलात जाण्यास बंदी घातली. यामुळे दोघेही आपापल्या काळात आदिवासींसाठी लढले. चला जाणून घेऊया, कोण होते अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम.
अल्लुरी सीताराम राजू:
सीताराम राजू यांचा जन्म 1897 मध्ये विशाखापट्टणम येथे झाला. अगदी लहान वयातच राजूने जीवनाची आसक्ती आणि माया सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता. त्यांनी देशातील अनेक मोठ्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. राजू महात्मा गांधींच्या विचारांनी खूप प्रभावित झाले आणि ते ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध उभे राहिले.
त्यांनी आदिवासींना दारू सोडण्याचे आवाहन केले आणि परस्पर वाद कोणा त्रयस्थ व्यक्तीकडे नेण्याऐवजी आपापसात वाद सोडविण्याचा सल्ला दिला. सीताराम राजूंवर इंग्रजांनी खूप अत्याचार केले, पण ते कधीही झुकले नाही. 1922 ते 1924 पर्यंत चाललेल्या राम्पा बंडाचा नेता म्हणून त्यांना स्मरण केले जाते. 1924 मध्ये ब्रिटिशांनी सीताराम राजू यांना झाडाला बांधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
कोमराम भीम
कोमाराम भीम यांचा जन्म सन 1900 मध्ये संकेपल्ली, आदिलाबाद येथे झाला. ते गोंड समाजाचे होते. ते इंग्रज आणि हैदराबादच्या निजामाच्या अत्याचाराविरुद्ध उभे राहिले. आदिवासींना सोबत घेऊन त्यांनी हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी बंडाचे रणशिंग फुंकले होते. कोमाराम हे गोरिल्ला युद्धात निष्णात होते आणि आदिवासींचा मसिहा म्हणून ओळखले जात होते.
असे म्हणतात की एकदा पीक काढणीच्या वेळी निजामाचे पटवारी लक्ष्मण राव आणि पट्टेदार सिद्दीकी आले आणि त्यांनी गोंड लोकांना कर भरण्यास सांगितले तसेच त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर कोमारामच्या हातून सिद्दिकी मारला गेला आणि लक्ष्मण राव जीव वाचवण्यासाठी पळून गेला.
त्यांनी इंग्रजी-हिंदी-उर्दू लिहायला शिकले आणि प्रेसमध्ये काम केले. त्यानंतर ते आसामच्या चहाच्या बागांमध्ये काम करू लागले. तेथे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध कामगारांसाठी आवाज उठवला आणि तुरुंगवास भोगला. त्यानंतर, आदिवासींना एकत्र करून, त्यांनी 1928 ते 1940 पर्यंत निजामाविरुद्ध गनिमी युद्ध सुरू ठेवले. सरतेशेवटी निजामाच्या सैनिकांशी झालेल्या लढाईत ते शहीद झाले.
महत्वाच्या बातम्या-
स्टाईलिश लूक, जबरदस्त ऍब्स, शाहरुख खानने शेअर केला ‘पठाण’चा पहिला लूक; कॅप्शनने लोकांना लावले वेड
नाद केला भावा तू! परदेशातील नोकरीला लाथ मारून मायदेशी फुलवली शेती, आज लाखोंची उलाढाल
बॉलिवूडच्या फेमस जोडीत आला दुरावा; लग्नाची बोलणी सुरू असतानाच श्रद्धा कपूरचा झाला ब्रेकअप
ठाकरे सरकारला दणका! परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय