Share

राज्याचे नवीन शिक्षणमंत्री दीपक केसरकराचं शिक्षण किती झालंय माहिती का? वाचून आश्चर्य वाटेल

नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गट आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा सर्वांनाच होती. शेवटी उशिरा का होईना पण मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप देखील केले. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून काम करणाऱ्या दीपक केसरकर यांना शिक्षण खात्याचे मंत्रीपद देण्यात आले आहे. ( how much education has been done by the new education minister)

शिक्षणमंत्री झालेल्या दीपक केसरकर यांना आता शिक्षण क्षेत्रासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल व त्या संदर्भात निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याआधी आपण महाराष्ट्राचे नवे शिक्षण मंत्री झालेल्या दीपक केसरकर यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया.

दीपक केसरकर मूळचे कोकणातले.. सावंतवाडी मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेले दीपक केसरकर सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व विधीमंडळात करतात. दीपक केसरकरांचे प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले आहे.

बी.कॉमपर्यंत दीपक केसरकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे त्यांनी एक्सपोर्ट मॅनेजमेंटचा एक डिप्लोमा देखील केला आहे. लोककल्याणाची आवड असणारे दीपक केसरकर पुढे राजकारणात आले. राजकारणात सुद्धा अभ्यासपूर्ण बोलताना ते दिसतात.

पूर्वी राष्ट्रवादीत असणारे दीपक केसरकर शिवसेनावासी झाले. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर ते शिंदे गटात सामील झाले. दीपक केसरकरांनी बंडा दरम्यान व त्यानंतरच्या पूर्ण काळात शिंदे गटाची बाजू उत्तम प्रकारे लोकांसमोर मांडली.

शिंदे गटाच्या वतीने केसरकरांना प्रवक्ते म्हणून नेमण्यात आले. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पदाबाबत ते काहीसे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र मिळालेल्या खात्याबाबत मी समाधानी असल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
सामान्यांचे आबा! ‘या’ चार निर्णयांमुळे आर आर पाटलांनी लोकांच्या मनात वेगळं घर केलं होतं
विनायक मेटे यांच्यासोबतचा किस्सा सांगताना पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, ती रुखरुख मनातच राहिली..
Gujrat riots : गुजरात दंगल: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची 15 ऑगस्टला सुटका

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now