पैशांचे पॉकेट पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवण्याची सर्वांना सवय असते. सर्रास सगळेच जण आपले पॉकेट मागच्या खिशात ठेवत असतात. मात्र आता हे पॉकेट मागच्या खिशात ठेवणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगण्यात येत आहे. जाणून घेऊ ते आरोग्याच्या दृष्टीने कसे हानिकारक आहे.
पुरुष नेहमी त्यांचे पैशांचे पॉकेट पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवतात. महिलांमध्ये हे प्रमाण कमी आहे. पॅन्टच्या मागच्या खिशात पॉकेट ठेवल्यानंतर ते चोरीला जाण्याची अधिक शक्यता असते. चोरी करणारा देखील सहज चोरी करतो. त्यामुळे पॉकेट मागच्या खिशात ठेऊ नका हे आपण कित्येक वेळा ऐकलं आहे. मात्र पॉकेट मागच्या खिशात ठेवणं आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलं नसल्याचे आता बोलले जात आहे.
बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीला अशी सवय असेल तर ती त्यानं ताबडतोब बदलायला हवी. खरं तर, ही सवय तुमच्या पाठीसाठी आणि तुमच्या बसण्याच्या स्थितीसाठी खूप धोकादायक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, तुमच्या मागच्या खिशात पॉकेट घेऊन बसल्याने तुमच्या शरीरामध्ये असंतुलन निर्माण होते.
शरीरामध्ये असंतुलन निर्माण झाल्याने, तुमची वागण्याची, बसण्याची श्रोणि खराब होते. श्रोणि ही बेसिनच्या आकाराची रचना आहे जी तुमच्या शरीरातील पाठीचा कणा आणि पोटाच्या अवयवांना आधार देते. याशिवाय पर्स मागे ठेवण्याच्या सवयीमुळे त्या भागात दुखणे, त्या भागाची झीज होणे आणि सायटिका इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
मागच्या खिशात पॉकेट ठेवल्याने, ऑस्टियोआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढतो. ही सवय दीर्घकाळ अशीच चालू ठेवल्याने वयाच्या मनाने आधीच सांधेदुखीचा त्रास होयला सुरुवात होते. त्यामुळे अनेक वेदना होऊन शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो.
डॉक्टरांच्या अहवालानुसार, जर तुम्ही तुमच्या पाकिटावर बसून 30 मिनिटे गाडी चालवली तर तुम्हाला पाठदुखी किंवा सायटॅटिक वेदनाची तक्रार होऊ शकते. त्यामुळे हा त्रास वाचवण्यासाठी अशा स्थितीत बसताना, गाडी चालवताना नेहमी पॉकेट गाडीच्या डिकीत ठेवावे किंवा समोरच्या खिशात किंवा पिशवीत ठेवावे.