Share

ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले शिवलिंग नव्हे तर कारंजे; मुस्लिम पक्षाचा फोटो जाहीर करत दावा

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरू आहे. रविवारी झालेल्या सर्वेक्षणादरम्यान, हिंदू पक्षाने  त्याठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. जिल्ह्याच्या वरिष्ठ विभागीय न्यायालयानेही शिवलिंगाची पावती ग्राह्य धरली असून, वकील हरिशंकर जैन यांनी दाखल केलेली याचिका ग्राह्य धरून शिवलिंगाची जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचवेळी मुस्लिम पक्षाकडून एक फोटो जारी करण्यात आला असून, शिवलिंग हे कारंजे असल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू धर्मीयांच्या वतीने हा कारंजा शिवलिंग असल्याचे सांगितले जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तेथे नक्की काय आहे याबाबतचा संभ्रम वाढला आहे.

अंजुमन इंसांजरिया समितीचे सहसचिव एसएम यासीन यांनी या फोटोला दुजोरा दिला आहे. सकाळी बारा फुटांचे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. मुस्लिम पक्षाचे वकील तौहीद यांच्या वतीने हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.

मुस्लीम पक्षाचा दावा, ज्याला शिवलिंग म्हटले जात आहे, तोच कारंजा आहे
दुपारपासूनच एक फोटो वेगाने व्हायरल होऊ लागला. या चित्रात एक लहान विहिरीसारखी रचना दिसत होती आणि मध्यभागी गोलाकार शिवलिंगाच्या आकाराची रचनाही दिसते. मध्यवर्ती संरचनेच्या वरच्या भागात काही क्रॅकच्या खुणा दिसत होत्या.

हा फोटो सोशल मीडियावर अनेक मुस्लिम लोकांकडून शेअर केला जात आहे. या व्हायरल फोटोबाबत पुष्टी करण्यासाठी अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीच्या सहसचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हे त्याच ठिकाणचे छायाचित्र आहे, ज्याचा शिवलिंग म्हणून प्रचार करण्यात आला आहे.

सकाळी आयोगाचे कामकाज संपल्यानंतर हिंदू पक्षाचे वकील सोहनलाल आर्य यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे ‘बाबा सापडले’. या खुलाशानंतर विश्व वैदिक सनातन संघाचे जितेंद्र सिंह बिसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, त्यांना सुमारे बारा फूट शिवलिंग तलावात सापडल्याची माहिती मिळाली आहे.

त्यानंतर ते काशीसह संपूर्ण देशभरात हे वृत्त पसरले. सर्वत्र त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली, की नेमकं त्याठिकाणी काय सापडले आणि त्याचे स्वरूप काय आहे. माध्यमांनी यासंदर्भात दिवसभरात विविध बातम्या दिल्या आहेत.

शिवलिंग कुठे सापडते?
शृंगार गौरी-ज्ञानवापी वादात न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्यात येत आहे. सोमवारी मशिदीच्या आत वजू करण्याच्या ठिकाणी तलावात 12 फुटांचे शिवलिंग आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा तलाव मशिदीच्या आत शेडखाली आहे.

जितेंद्र सिंह बिसेन यांनी सांगितले की, त्यांनी शिवलिंग पाहिलेले नाही, मात्र त्याची लांबी १२ फूट असल्याचे सांगितले जात आहे. मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावर हिंदू संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. तलावात शिवलिंग आढळताच परीसर हर हर महादेवच्या घोषणांनी गुंजू लागल्याचे सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :-
औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसींचं अभिनेत्री रवीना टंडनकडून समर्थन? ट्वीट तुफान व्हायरल
मित्राच्या लग्नात पत्नीसोबत डॅशिंग अंदाजात पोहोचला KGF स्टार यश, पहा जबरदस्त फोटो
नवा चित्रपट फ्लॉप होताच महेश बाबूचा बदलला सूर; म्हणाला, बॉलीवूड चित्रपट करायला हरकत नाही

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now