Kanishka Soni, Diya Aur Baati Hum, Pavitra Rishta, Hollywood/ बदलत्या काळानुसार लग्न आणि नात्याबाबत लोकांची विचारसरणीही बदलत आहे. आधुनिक जगात अनेक मुली एकटे राहून राहून एकटेच राहणे पसंत करत आहेत. टीव्ही शो ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीनेही असेच करायचे ठरवले आहे. होय, टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनीने स्वतःशीच लग्न केले आहे. तिचा हा निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कनिष्का सोनीने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेली दिसली. कनिष्का सोनीचे हे फोटो पाहून तिचे सर्व चाहते आश्चर्यचकित झाले. तिचे फोटो पोस्ट करत कनिष्काने कॅप्शनही लिहिले आहे, जे वाचून लोकांची तारांबळ उडाली.
मंगळसूत्रातील तिचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, मी स्वतःशी लग्न केले आहे. मी माझी सर्व स्वप्ने स्वतः पूर्ण केली आहेत आणि मी ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करते ती एकमेव व्यक्ती मीच आहे. मला दुसऱ्या माणसाची गरज नाही. मी माझ्या गिटारसह एकटे राहण्यात नेहमीच आनंदी असते. मी देवी आहे, मी बलवान आणि सामर्थ्यवान आहे. शिव आणि शक्ती हे सर्व माझ्या आत आहेत. धन्यवाद
भांगात कुंकू भरलेले आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेले अभिनेत्री कनिष्का सोनीचे फोटो सोशल मीडियावर गाजत आहेत. तसेच तिची सर्वत्र चर्चा होत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत तिच्या निर्णयाला धाडसी म्हटले आहे. कनिष्का सोनीने एक धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावे लागेल.
एडवेंचरची आवड असलेली अभिनेत्री कनिष्का म्हणाली, मला एडवेंचर आवडते. मला माझ्या आवडत्या गोष्टी करून माझे दिवस संस्मरणीय बनवायचे आहे. मी पार्टी पर्सन नाही. मी बहुतेक पार्टीत जायला टाळाटाळ करते.
कनिष्का सोनी ‘दिया और बाती हम’, ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘देवी आदि पराशक्ती’ सारख्या अनेक हिट टीव्ही शोचा भाग आहे. ‘दिया और बाती हम’, ‘पवित्र रिश्ता’ या दोन्ही शोने टीव्ही जगतात खळबळ उडवून दिली होती. चाहत्यांना या शोचे वेड लागले होते. त्याचवेळी कनिष्काबद्दल सांगायचे तर ती आता हॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिने टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Bollywood: आता बाॅलीवूडवरही ईडीची काडी; अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस २०० कोटींच्या घोटाळ्यात आरोपी
Karan Mehra: आता ही अभिनेत्री सांगणार करण मेहराबद्दलचे संपुर्ण सत्य, निशा रावलच्या विरोधात देणार साक्ष
Aamir Khan: या ४ अभिनेत्रींनी दिला होता आमिर खानसोबत काम करण्यास नकार, वाचून आश्चर्य वाटेल
Ratan Rajput: तो मला जबरदस्तीने जंगलात घेऊन जात होता आणि लोक बघत होते, अभिनेत्रीने सांगितला भयानक किस्सा