सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्यातील एखादी गोष्ट समोर आली तर ती प्रचंड वेगात व्हायरल होत असते. सध्या अभिनेता सलमान खान याच्या घरातील एक गोष्ट बाहेर पडली आहे, ज्याबद्दल प्रचंड चर्चा होताना दिसत आहेत. ही व्हायरल होणारी गोष्ट म्हणजे सलमानच्या घरात आणखी एक घटस्फोट होणार आहे.
सलमानचा भाऊ अरबाज खाननंतर आता सोहेल खाननेही पत्नी सीमा खानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेल आणि सीमा यांचे 1998 साली लग्न झाले आणि आता 24 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
चाहत्यांना ही बातमी समजल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. घटस्फोटासाठी आज सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान हे दोघे फॅमिली कोर्टात पोहोचले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी व्हिडीओला प्रतिक्रिया देत घटस्फोट न घेण्याचा सल्ला दिला आहे.
एकीकडे सलमान खानचे अद्याप लग्न झालेले नसताना अरबाजनंतर सोहेलच्या घटस्फोटाची बातमी ऐकून खान कुटुंबीयांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. माहितीनुसार, अरबाज आणि मलायकाप्रमाणेच सोहेल आणि सीमानेही प्रेमविवाह केला होता.
असे म्हटले जाते की, सोहेल पहिल्या नजरेतच सीमाच्या प्रेमात पडला होता. सोहेल आणि सीमा हे सध्या दोन मुलांचे पालक आहेत. सोहेल आणि सीमा यांना निरवान खान आणि योहान खान ही दोन मुले आहेत. निर्वाण वयाने मोठा आहे आणि तो हुबेहुब त्याचे वडील सोहेलसारखा दिसतो.
सोहेल आणि सीमा यांच्या लग्नाच्या दोन वर्षानंतर 15 डिसेंबर 2000 रोजी मुंबईत निर्वाणचा जन्म झाल्याचे सांगण्यात येत आहे. निर्वाण अनेकदा सोशल मीडियावर काका सलमान खानसोबत वेळ घालवताना दिसतो. माहितीनुसार, निर्वाणचे शालेय शिक्षण मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून झाले आहे.