न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालय आयोगाने (Court Commission) ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) आत सर्वेक्षण केले. सर्वेक्षण पूर्ण झाले. मात्र अहवाल सादर करण्यापूर्वीच न्यायालयाने आयोगाचे प्रमुख असलेल्या अजय मिश्रा (Ajay Mishra) यांची आयोगातून हकालपट्टी केली. विशाल सिंग (Vishal Singh) आता आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करणार आहेत.(Gyanvapi Masjid, Ajay Mishra, Vishal Singh, Court Commission)
वृत्तानुसार, सर्वेक्षण टीमचा भाग असलेले विशेष वकील आयुक्त विशाल सिंह यांनी अजय मिश्राविरोधात न्यायालयात तक्रार केली होती. अजय मिश्रा अहवाल तयार करताना सहकार्य करत नसल्याचा आरोप करत विशाल सिंह यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. अजय मिश्रा यांच्यावर असाही आरोप करण्यात आला होता की, त्यांचा पर्सनल कॅमेरामन आरपी सिंग सर्वेक्षणाची माहिती मीडियाला लीक करत आहे.
न्यायालयाच्या लेखी आदेशात म्हटले आहे की, अजय मिश्रा यांनी त्यांच्या वतीने एक खाजगी कॅमेरामन ठेवला होता, जो मीडियाला माहिती देत होता. त्यांचा कॅमेरामन आरपी सिंग यांच्यावर मीडियाला चुकीचा बाईट दिल्याची बाब आदेशाच्या प्रतीमध्ये लिहिली होती. न्यायालयाला त्यांचे वर्तन बेजबाबदार वाटले. त्यावर न्यायालयाने कारवाई करत अजय मिश्रा यांची आयोगातून हकालपट्टी केली. अजय मिश्रा यांना हटवत न्यायालयाने विशाल सिंग यांना आयोगाचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. या कामात अधिवक्ता अजय प्रताप सिंग हे विशाल सिंग यांना सहकार्य करणार आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानंतर मिडियाशी बोलताना अजय मिश्रा यांच्या वेदना वेदना झळकल्या. अजय मिश्रा रडू लागले. ते म्हणाले की, संपूर्ण पाहणीदरम्यान त्यांनी विशाल सिंग यांना सहकार्य केले. विशाल सिंगला मी मोठा भाऊ मानत होतो. विशाल सिंह यांच्या सांगण्यावरून मी काल रात्री १२ वाजेपर्यंत आयोगाचा अहवाल तयार करत होतो.
ते पुढे म्हणाले सकाळी उठल्यावर त्यांच्या सांगण्यावरून मला आयोगातून काढून टाकण्यात आल्याचं कळलं. मी खूप दुखी आहे. माझ्या मनाला माहीत आहे की मी काहीही चूक केली नाही. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेन आणि मी गप्प बसेन. पण मी काही चुकीचे केले नाही. विशाल सिंग माझ्याशी याबद्दल कधी बोललाही नाही.

विशाल सिंह म्हणाले की, अजय मिश्रा यांचा गैरसमज झाला आहे. अजय मिश्रा यांच्या हकालपट्टीसाठी मी न्यायालयात तक्रार केलेली नाही. ते म्हणाले, या प्रकरणातील प्रतिवादी क्रमांक ४ ने अजय मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे परिस्थिती सांभाळण्यासाठी मी कोर्टात अर्ज केला होता. तपासात सहकार्य नाही, असे मी म्हणालो. याशिवाय मी न्यायालयात कोणतेही भाष्य केलेले नाही. अजय मिश्रा गैरसमजाचा बळी झाल्याचे विशाल सिंह यांनी सांगितले. आम्ही एकत्र बसून एकमेकांना समजावून सांगू. न्यायालयाने त्यांना हटवले असे नाही, अजय कुमार मिश्रा ६ आणि ७ तारखेला सर्वेक्षण अहवाल देतील आणि मी १४-१५-१६ ला अहवाल देईन.
१६ मे रोजी तीन दिवसीय सर्वेक्षण पूर्ण झाले. १७ मेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून त्याच दिवशी आयोगाने आपला अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मंगळवारी १७ मे रोजी न्यायालयात सुनावणी झाली असता आयोगाने अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला. आयोगाने सांगितले की, अनेक तासांची व्हिडिओग्राफी आणि अनेक छायाचित्रे आहेत. अहवाल संकलित आणि तयार करण्यासाठी थोडा वेळ लागतो. आयोगाची ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. आता १९ मे रोजी आयोग आपला अहवाल न्यायालयात सादर करू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीच्या जामा मशिदीच्या खाली विष्णू मंदिर, सर्व्हे केला तर मूर्त्या सापडतील; भाजप खासदाराचा दावा
ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदीर असेल तर ते हिंदूंना दिलेच पाहीजे, कारण…; सपाच्या महीला नेत्यानेच केली मागणी
ज्ञानवापी मशिद: 12 फूट 8 इंच शिवलिंग मिळाल्याचा दावा मुस्लिम पक्षाने फेटाळला, म्हणाले..
ज्ञानवापी ही मशिद होती आणि शेवटपर्यंत मशिदच राहील; कोर्टाच्या आदेशानंतर औवेसी संतापले